Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलंची जन्मशताब्दी: जन्मशताब्दी महोत्सव

Author: Share:
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, मराठी भाषेला लाभलेले अवलिया पुल देशपांडे यांची आज जन्मशताब्दी. महाराष्ट्राला पुलंनी दिलेले सारस्वताचे देणे अमूल्य आहे. त्यांची कथा, त्यांची पात्रे त्यांची वाक्ये अजरामर झालीच आहेत, पण मराठी माणसे दैनंदिन वापरातही ही वाक्ये वापरतात, हसतात. पुलंनी मराठी माणसाचे आयुष्य व्यापून टाकलेले आहे.
पुलंनी मराठी कला सर्वार्थाने समृद्ध केली आहे. साहित्याला विनोद, प्रवासवर्णने, नाट्य चित्रपट, कथाकथन, विडंबन अशा विविधांगांनी सजवले. हार्मोनिअम वादनातून लाकडी पेटीची जादू पसरवली, संगीतकार म्हणून अजरामर गाणी मराठी भाषेला दिली आणि विचारवंत म्हणून कालातीत विचारही सोप्प्या भाषेत सांगून गेले. पुलंच्याच सखाराम गटणे मधून वाक्य घ्यायचे तर आयुष्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एकदा जन्माला येतात. पुलंच्या जीवनाने मराठी पिढ्यांची आयुष्ये सजली आहेत.
दिपावलीनिमित्त पुलंवर बेतलेले अनेक दिवाळी पाहायचे कार्यक्रम सादर झाले. आजपासून महाराष्ट्र शासनाचा पुल जन्मशताब्दी हा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे सुरु होत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे:
८ नोव्हेंबर: सायंकाळी ७ उदघाटन
                 ७.३० वक्ता दशसहस्त्रेषु : पुलंच्या दुर्मिळ भाषणांचा दृक श्राव्य कार्यक्रम
१० नोव्हेंबर: सायंकाळी ६: जुळल्या सगळ्या आठवणी (बाबूजींच्या गाण्यांवर कार्यक्रम)
                   सायंकाळी ७.३०: गाऊ त्यांची आरती (बाबूजी, गदिमा आणि पुलंवर आधारित कार्यक्रम)
११ नोव्हेंबर: दुपारी ४ आम्ही आणि आमचे बाप (नाटक)
                  सायंकाळी ७: सदू आणि दादू (दीर्घांक)
१२ नोव्हेंबर: सायंकाळी ६: बहुरूपी पुल (अभिवाचन , पार्श्वसंगीत आणि व्यक्तिचित्र सादरीकरण)
                 सायंकाळी ७.३०: सुजनहो!  (पुलंच्या भाषणावर आधारित)
१३ नोव्हेंबर:  सायंकाळी ६: आनंदयात्री (मुलाखत: अतुल परचुरे आणि विजय केंकरे)
                 सायंकाळी ७.३०: गदिमांन्य  (गदिमांवर आधारित)
१४ नोव्हेंबर: सायंकाळी ६: मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास (नाटक)
                 सायंकाळी ७.३० पुलंचे पौष्टिक जीवन (अभिवाचन)
१५ नोव्हेंबर: सायंकाळी ६: बिल्हण (सांगीतिका)
                 सायंकाळी ७.३० गुण गाईन आवडी (अभिवाचन, गायन)
१६ नोव्हेंबर: सायंकाळी ६. एक झुंज वाऱ्याशी (नाटक)
                 सायंकाळी ७.३० : पुलब्रेशन (तरुणांच्या नजरेतून पुल)
१७ नोव्हेंबर: सायंकाळी ७.३० कवितांजली (सहभाग: डॉ अरुण ढेरे, डॉ वीणा देव, संदीप खरे आणि जितेंद्र जोशी)
१८ नोव्हेंबर: सायंकाळी ७.३० पुलंची मुशाफिरी (पुलंच्या आठवणी)
Previous Article

Review: ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’: एक ‘लांडगा’ चित्रपट

Next Article

संवत २०७५ मार्केट कसे असेल?

You may also like