दिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग

Author: Share:

नाशिक :- उत्तम गिते: दिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिप रिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग आला असून रिपरिप पडणाऱ्यां पावसामूळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पावसाचा तालुका म्हणून दिडोंरी तालूक्यांकडे बघीतले जाते त्यामूळे सर्वाधिक धरणे हे दिडोंरी तालूक्यांच्या पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात असल्याने याच धरणांतील पिण्याचे व शेतीचे पाणी पुर्व भागातील शेतकऱ्याना वर्षेभर दिले जाते धरणे भरतील का? हा मोठा प्रश्न पूर्व भागातील सत्तावत असतो या वर्षी हवामान खात्याच्या आव्हाला नूसार उमराळे बु परिसरात पाहीजे तसा पाऊस न पडल्याने वाघाड धरणात पाहीजे तसा पाणी साठा उपलब्द नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

उमराळे बु भाग पावसांचा परिसर असुनही पावसांचे प्रमाण कमी प्रमाणात आहे या वर्षी जून महीणा संपला तरी पावसांचा पत्ताच नव्हता त्या नंतर जुलै महीण्यात रिपरिप सूरू केल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन भुईमूंग आदि पिकांची थोड्या प्रमाणात पेरण्या केल्या व परत पावसांने पुन्हा रिपरिप सूरू केल्याने काही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळबंल्या असून हा पाऊस भात शेतीसाठी चांगला असल्याने भात आवणीस सुरूवात केल्याचे दिसते त्यातही काही थोडया प्रमाणात शेतकऱ्यांकडे भात शेती आहे उमराळे बु परिसरात जोरदार पाऊस पडला तरच धरणे भरतील असे शेतकऱ्यांनी सांगितले

Previous Article

एका फर्जंद मावळ्याच शिवाजी राजांस पत्र

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ४

You may also like