पश्चिमी क्षत्रपांची नाणी

Author: Share:

“पश्चिमी क्षत्रपांची नाणी” या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा हा प्रवास हा एखाद्या फिरस्ती पेक्षा कमी नव्हता ! ३५० वर्षांचा क्षत्रपांच्या राज्याच्या हा प्रवास करणं फार रंजक होत, माळवा-गुजरात पासून जरी राज्यास त्यांनी सुरुवात केली असली महाराष्ट्रातही त्यांनी त्यांची सत्ता वाढवली, आणि त्यांच्या या इतिहासाचे पुरावे शोधून संकलित करणं फार स्फुरतीदायक होत, या प्रवासात क्षत्रपांचे विविध पैलू नजरेस पडले, क्षत्रप हे अगुन्तक होते बाहेर देशातून भारतात आले आणि बाहेर देशातून येऊन भारतात जवळ जवळ ३५० वर्षे सलग आपली सत्ता गाजवली आणि ते देखील सातवाहनांसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना, हा इतिहास असभ्यासताना सर्वात जास्त मदतगार ठरली ती क्षत्रपांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची नाणी आणि हे सर्व अभ्यासल्यानंतर समोर आले छोटेखानी पुस्तक “पश्चिमी क्षत्रपांची नाणी”.
दहावीत असताना पुस्तक लिहिण्याच्या विचार करणे म्हणजे मुळातच बहुतेकांना मूर्खपणा वाटतो आणि काहींना आश्चर्य !

अशीच काहीशी सुरुवात माझीजी झाली, नववीत होतो तेव्हा नाणी संग्रहाचा हा वेडा छंद लागला, हा छंद वेडा आहे हे संग्रह सुरु केल्यानंतर कळलं पण यात मिळणारा आनंद हा शब्दात सांगणे कठीण. संग्रह वाढत होता पण जे करतोय त्याचे ज्ञान नाही त्याचा अभ्यास नाही मग काय उपयोग?, विचार केला कि छंद शेवटपर्यंत फक्त छंदच राहिला तर त्यात मजा नाही, त्याचा अभ्यास असावा असं वाटू लागलं. पुस्तकांचा शोध सुरु केला, पुस्तकांच्या शोधात भटकू लागलो जिथली माहिती मिळाली तिथे जाऊ लागलो, शेवटी काही पुस्तक मिळाली, पण फक्त काहीच ! फक्त बोटावर मोजण्याइतकी पुस्तक हाती लागली, त्यात मराठी पुस्तक तर फारच कमी. वाईट वाटलं ! स्वतः ला प्रश्न पडू लागले, मराठीत इतकी कमी पुस्तक का ? बाहेर देशातील अभ्यासक भारतात येऊन आपल्या इतिहासावर अभ्यास करू शकतात मग आपण का नाही करत ? पुस्तक वाचू लागलो आणि माझा कल नाणकशास्त्राकडे वळत गेला, नाणकशास्त्र हा फार कठीण आणि फार खोल विषय आहे हे कळू लागलं अशक्य मुळातच नाही हे मी मानून होतो, स्वतः ला मिळालेली हि वाट फार कमी जणांनी अनुभवली होती.

मी आणखी पुस्तकांच्या शोधात भटकू लागलो, अजून कुठे काय नाण्यांबद्दल वाचायला मिळेल हे शोधू लागलो, या पुस्तकांच्या शोधात मला लवकर चांगले आणि वाईट असे दोनही अनुभव आले. फक्त पुस्तकांसाठी काही वेळा माझ्याकडील दुर्मिळ वस्तू मला द्याव्या लागल्या, आणि त्याच्या बदल्यात मिळाली त्या पुस्तकाची झेरॉक्स ! आज पुस्तक मी उपलब्ध करू शकतो पण ती वस्तू नाही याची खंत आहेच ! आणि याच पुस्तकात मला प्रथमतः क्षत्रपांबद्दल वाचण्यास मिळाले, बाहेरील देशातून येऊन क्षत्रपांनी जवळ जवळ ३५० वर्षे राज्य केले हे वाचल्यानंतर माझी त्या विषयाप्रती उत्कंठा अधिकच वाढली. मग मी सातवाहनांबद्दल वाचू लागलो त्यात क्षत्रपांचा उल्लेख पुन्हा पुन्हा येत होता, प्रामुख्याने नहपान राजाचा उल्लेख येत होता.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

क्षत्रप- सातवा


हनांच्या इतिहासाबद्दल काही पुस्तके होती पण नाण्यांबद्दल शोधल्यास मला एकही पूर्ण माहिती देणारे पुस्तक आढळले नाही. काही दिवसानंतरच हातात पहिले क्षत्रपांचे नाणे आले क्षत्रप नहपानाचे, त्या नाण्यांवरील नहपानाचा चेहरा पाहून अंगात अचानक स्फूर्ती अवतारल्यासारखे वाटले, त्या नाण्यांवरील त्याचे मोठे डोळे, बाकदार नाक आणि त्याचा तो डौल पाहून मी त्याच्याकडे आकर्षित झालो, आणि या क्षत्रपांची नाणी आणि इतिहास अभ्यासला पाहिजे असं वाटू लागलं आणि मी माझ्या स्वतः साठी अभ्यास सुरु केला, आणि अभ्यासताना मला या नाण्याबद्दलची काही इंग्रजी पुस्तकें मिळाली ती मी बारकाईने अभ्यासली, माझा त्यात रस आणखी वाढत गेला. आता क्षत्रपांची नाणी वाचण्यासाठी महत्वाची होती ती त्या नाण्यांवर असणारी ब्राह्मी लिपी, मग मी स्वतःच ब्राह्मी लिपी शिकायला सुरु केली आणि लवकरच मी ती शिकलो. हे सर्व अभ्यासताना मी स्वतःसाठी याबद्दलच्या नोट्स काढत होतो. आता हि नाणी थोडी थोडी कळू लागली होती, याचबरोबर शाळेचा अभ्यासही सुरूच होता.

मग मी माझ्या ओळखीत असलेल्या काही तज्ञांना याबद्दल तुम्ही यावर पुस्तक लिहा ना अशी विचारणा करू लागलो, पण सकारात्मक प्रतिसाद येतांना दिसत नव्हता. तेव्हा एका तज्ञानी मला सांगितले कि “प्रत्येक संग्राहक हा अभ्यासक नसतो आणि तो होऊ हि शकत नाही”, त्यावेळी मला ती गोष्ट पटली. पण यावर आता प्रश्न असा होता कि प्रत्येकानी जर असा विचार केला तर मग आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठून ?? आणि या घडीपर्यंत तर पुस्तक लिहावा असा विचार माझ्या मनातही नव्हता. आई- वडिलांना यातील फार माहिती नव्हती पण या विषयाबद्दल त्यांच्याशी फार बोलायचो आणि अजूनही बोलतो, मग तेच मला म्हणाले अरे तू का लिहत नाहीस मग पुस्तक ? आता हे ऐकल्यानंतर तर बोलायलाच नको, “न्यूनगंड” नावाचा प्रकार माझ्यात ठासून ठासून भरलेला होता, कुठलीही गोष्ट करण्याआधी त्यावर लोक काय म्हणतील हा विचार मी करायचो. इतके मोठे तज्ञ लोक आहेत, अभ्यासक आहेत त्यांच्यासमोर मी काय ? आणि मी जर पुस्तक लिहिले तर ते काय म्हणतील ? मी तर अजून १२ वि हि पास नाहीये ! हे सर्व मोठे प्रश्न माझ्यासमोर होते. या विषयावर पुस्तक लिहिणे म्हणजे हे एक शिवधनुष्यच होते, मी माझ्यासाठी नोट्स काढलेल्या होत्या पण त्या मी लेखक म्हणून पुस्तकात मांडणं म्हणजे कठीण वाटत होत. अजूनही पुस्तक लिहावं या हेतूने लिखाण सुरु केलं नव्हत.

हि नाणी अभ्यासताना मला आलेल्या अडचणी मी शोधू लागलो, त्यावर उत्तर सापडउ लागलो. मला हि नाणी पाहिल्यावर चिन्ह ओळखायला आलेल्या अडचणींवर मी पर्याय शोधू लागलो, हळू हळू सर्व चिन्ह नावानिशी मी कागदावर काढली. पुढची अडचण ती नाण्यांवरील राजांची नावे वाचायची मग त्यासाठी मी प्रत्येक नाव ब्राह्मी ते देवनागरी लिप्यतर करू लागलो, त्याचा पूर्ण चार्ट तयार केला. नाणं कसा वाचावा त्यासाठी मी चित्र काढले की ज्याद्वारे आपण सहज हि नाणी वाचू शकतो. पुढची अडचण ती म्हणजे नाण्यांवरील कालोल्लेख वाचण्याची मग त्यासाठीही तक्ता तयार केला आणि कशी वाचावी हे सर्व लिहून काढले. हे सर्व झाल्यानंतर मी काही तज्ञांना हे दाखवले त्यांना ते फार आवडले काहींनी त्याच्या झेरॉक्स काढून घेतल्या, मग वाटले चला आपण काहीतरी चांगलं करतोय ! न्यूनगंड थोडा कमी झाला, आणि आता हे पुस्तक म्हणून नावारूपास येऊ शकता असं वाटू लागलं ! मग मी जोमाने कामाला लागलो, आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आणखी यात काम करत गेलो, चांगल्याप्रकारे लिखाण होऊ लागला होता, एका प्राथमिक नाणी संग्राहकाला उपयोगी होईल असे पुस्तक तयार होण्याच्या मार्गावर दिसत होत.

एका संग्राहकाला नाणी अभ्यासताना काय अडचणी येतात हे मी जाणून होतो आणि ते सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मी याद्वारे करत होतो. या सर्व लेखनात एक वर्षाचा कालावधी लोटला, आणि आता पुस्तकाची एक कच्ची प्रत तयार झाली होती, लिहिलेलं सर्व ज्ञानाप्रमाणे होत, चुका असणार हे निश्चित होत. हि पुस्तकाची कच्ची प्रत मी अमितेश्वर झा यांना दाखवली त्यांना काम आवडलं पण अजून काही काळानंतर हे पुस्तक प्रकाशित करावं असा त्यांनी मला सल्ला दिला, खरं तर कुणाकडेही गेलो असतो तर कुणीही हाच सल्ला दिला असता कारण नाणकशास्त्रासारख्या कठीण विषयात आणि त्यातल्या त्यात पश्चिमी क्षत्रप या विशिष्ट विषयात काम करून एखादा १० वी-११ वी चा मुलगा तुमच्यासमोर पुस्तक सादर करेल तर त्यात विशेष तर वाटणारच होत !

मग मी आणखी काही काळ त्यावर काम केले आणि झा सरांनी सुचवलेल्या चुका मी सुधारावल्या. आता पुस्तक ठीक वाटत होत, मग मी काही प्रकाशकांकडे पुस्तक प्रकाशनासाठीची मागणी केली. पण बाकीच्यांना पुस्तक प्रकाशनाच्या येणाऱ्या अडचणी मला कधीच आल्या नाही, मी ऐकून होतो कि प्रकाशक नवीन लेखकांचे पुस्तक छापत नाहीत आणि अश्या विशिष्ट विषयांचे तर नाहीच ! पण ज्यावेळी मी औरंगाबादेतील काही प्रकाशकांना याकरिता मागणी केली तर ते लगेच तयार झाले. पण माझी इच्छा होती कि हे पुस्तक प्रत्येक अभ्यासक आणि संग्राहकांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी मी पुण्यातील काही प्रकाशकांना मेल केले, जवळ जवळ सर्वांचे सकारात्मक प्रतिसाद आले, जे माझ्यासाठी चांगलं होत. आणि प्रथमतः पुण्यात एका नानींप्रदर्शनावेळी मी माझे पुस्तक “मर्व्हन टेकनॉलॉजिस” च्या श्री. मनोज केळकरांना दाखवले, त्यांना ते फार आवडले आणि मग त्यांनीच ते प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यानंतर पुस्तकातील बर्याचश्या चुका दुरुस्त झाल्या त्यात टिळक विद्यापीठातील मंजिरी भालेराव यांची फार मदत लाभली, पुस्तकात चांगले फोटोस टाकण्यात आले, पुस्तकाचे संपादन आणि प्रूफरीडिंग करण्यात आले, पुस्तकाचे कव्हर निश्चित करण्यात आले आणि या सर्व प्रवासातून “पश्चिमी क्षत्रपांची नाणी” हे छोटेखानी पुस्तक नावारूपास आले ! या सर्वात आणखी एक वर्षाचा कालावधी लोटला आणि १५ डिसेम्बर २०१७ या दिवशी श्री. बस्ती सोळंकी आणि पुणे कॉइन सोसायटी च्या सहकार्याने “पश्चिमी क्षत्रपांची नाणी” हे पुस्तक “कॉईनेक्स, पुणे २०१७” या कार्यक्रमात प्रकाशित झाले.

या पुस्तकाने दिलेला अनुभव मला फार काही शिकवून गेला जो माझ्या पुढील आयुष्यासाठी मला मदतीचा राहील ! क्षत्रपांच्या नाण्यांचा हा इतिहास मांडतांना मला फार आनंद झाला कि क्षत्रपांच्या नाण्यांवरील मराठीतील पहिले पुस्तक हे माझ्या लेखणीतून अवतरले आणि ते कित्तेक अभ्यासकांना आज हि नाणी अभ्यासण्यासाठी मदत करत आहे ! मला हि नाणी अभ्यासताना ज्या अडचणी आल्या त्या यानंतर कुणालाही येणार नाहीत याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे.

क्षत्रपांपासून सुरु झालेला हा प्रवास असाच चालू राहील याची मी खात्री बाळगतो आणि याच प्रकारे नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील !

लेखक: आशुतोष पाटील


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

सर्कस

Next Article

महाराष्ट्र

You may also like