पसायदान विश्वधर्माचे प्रतीक

Author: Share:

“संत ज्ञानेश्वरांनी निर्मिलेली पसायदान ही प्रार्थना कोणत्याही धर्मचिन्हासोबत लावली गेली, तरीही ती त्या धर्माचे प्रतिनिधीत्व करते, असे सामर्थ्य असलेली ही एकमेव प्रार्थना आहे, तेच पसायदानाचे खरे सौंदर्य आहे”

– महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

 

विश्‍वशांती केंद्र (आळंदी) आणि डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर जागतिक शांतता पुरस्कार अमेरिकेतील ‘चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्स’चे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन यांना प्रदान करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल, ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, फादर फंक, एल्डर रॉबर्ट विल्यम्स, मॅथ्यू हॉलंड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. स्वाती कराड- चाटे, नानिक रुपानी आदी उपस्थित होते.

Previous Article

दहीहंडी अपडेट्स 

Next Article

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला केले संबोधित 

You may also like