Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पंडित विष्णु नारायण भातखंडे जन्मदिवस-१० ऑगस्ट १८६०

Author: Share:

पंडित विष्णु नारायण भातखंडे (१० ऑगस्ट १८६०– १९ सप्टेंबर १९३६हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताचे भास्कराचार्य होते. भारतात शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून भातखंडे संगीत शास्त्राची निर्मिती केली आणि प्रशिक्षण केंद्रे स्थान केली.    हिंदुस्तानी संगीत पद्धती नावाचा एक चार खंडांचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे, आणि हिंदुस्थानी संगीत क्रमिक ग्रंथाची रचना केली आहे. या मध्ये  धृपद, धुमार आणि ख्याल गायकी स्वरलिपी बद्ध केली आहे. 

 त्यांचा जन्म मुंबई मधील वाळकेश्वर येथे १० ऑगस्ट १८६० रोजी झाला.  आईवडील संगीतप्रेमी असल्याने लहानपणापासूनच  रुची निर्माण झाली.  लहानपणापासून प्रशिक्षण आणि उत्तमोत्तम गायकांनी गायकी ऐकण्याने त्यांना गाण्याची उत्तम समाज आली. १९०७ मध्ये त्यांनी संगीत यात्रेला सुरुवात केली. सार्वराथम दक्षिणेत जाऊन त्यांनी वाचनालयातील उत्तम ग्रंथांचा अभ्यास  केला, विद्वानांशी चर्चा केली. उत्तम कलाकारांना ऐकले आणि त्यांच्याकडून संगीताचे विविध पैलू शिकून घेतले. नंतर उत्तर आणि पूर्वेकडेही ते गेले. तिथेही हाच अभ्यास केला. हैद्राबाद, विजयनगर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जगन्नाथपुरी कलकत्ता. नागपूर अशा ठिकाणी ते फिरले. विविध थाटांचा, रागदारी पद्धतीचा, रंगांच्या वर्गीकरणाचा अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी भातखंडे स्वरलिपी बनवली जी आज आपण वापरतो. अनेक संस्था आणि मंदिरांमध्ये असलेल्या हस्तलिखितांतील ज्ञानही त्यांनी आपल्या प्रकाशनातून बाहेर आणले आहे. 
 
भातखंडे संगीत विद्यालय, लखनऊ, माधव संगीत विद्यालय, ग्वाल्हेर, संगीत महाविद्यालय, बरोडा या ठिकाणी त्यांनी शिक्षण केंद्रे स्थापन केली/सहकार्य केले. १९१६ मध्ये बडोदा येथे त्यांनी भव्य संगीत परिषदेचे आयोजन केले . नंतर, दिल्ली, बनारस आणि लखनौ येथेही परिषदा आयोजित केल्या गेल्या . 
 
संगीतासाठी एवढे भरघोस काम करून ठेवणाऱ्या या मराठी संगीत महर्षींना स्मार्ट महाराष्ट्र तर्फे मानाचा मुजरा!
Previous Article

जगन्नाथ रघुनाथ आजगावकर

Next Article

जनरल अरुणकुमार वैद्य

You may also like