२०१९ च्या  पूर्वसंध्येला ३६००० वर उभे मार्केट…

Author: Share:

आज २०१८ची शेवटची दुपार कलत असताना सेन्सेक्स ३६००० वर बंद झाला. नवीन वर्षात प्रवेश करताना सेन्सेक्स कुठे उभा आहे, मागील वर्षाचा आढावा काय घायचा आणि पुढील वर्षी काय अपेक्षित करायचे ह्याची चर्चा करणारा हा लेख!

मागील महिन्यात पहिले काही दिवस पडणारे मार्केट मागचे पंधरा दिवस चांगली ग्रोथ दाखवत आहे. १० डिसेंबरला ३५००० वरून वर येणाऱ्या मार्केटने २४ डिसेंबर ला ३४५०० वर सपोर्ट असल्याचे दाखवले आहे. मागील तीन महिन्यांच्या चार्ट कडे पाहिल्यास ३६ ऑकटोबर रोजी ३३३४० ची पातळी सेन्सेक्सने गाठली होती. त्यावरून सावरताना मार्केटने ३४८०० आणि नंतर ३५००० वर सपोर्ट दाखवला. मागील सहा महिने आणि वर्षभराचा विचार केल्यास मात्र सेन्सेक्सची मोठी घसरण झाल्याचे चित्र समोर येईल, आणि पडझडीतून सावरताना अजूनही खरेदीच्या उत्तम संधी असल्याचे समजेल.

याचे कारण असे की २ जुलै ला ३५००० असणारा सेन्सेक्स २९ ऑगस्ट ला ३८४९६ वर पोहोचला होता. या दरम्यान तो सतत वाढत गेला होता. २९ ऑगस्ट नंतर तितक्याच वेगाने तो कोसळला तो २६ ऑकटोबरला त्याने ३३३४९ चा तळ पाहिला. इथपासून तो मागील तीन महिने सतत वाढ दाखवतो आहे. ही वाढ जुलै ते ऑगस्ट इतकी धारदार (steep) नसली तरी सातत्यपूर्ण आहे. याचा अर्थ मार्केट सावरत आहे, आणि हळूहळू पण सक्षमपपणे वाढत आहे. या विधानाला दुजोरा पूर्ण वर्षाचा चार्ट पहिला की मिळतो.  १ जानेवारी २०१८ ला ३३८१२ ला ओपन झालेला सेन्सेक्स वेगाने ३६००० वर पोहोचून पुन्हा ३३१७० पर्यंत गडगडला. इथून त्याने पुन्हा उसंडी मारली आणि सलग वाढत ३८४९६ ची झेप घेतली. पुढील कथा वर लिहिली आहे. हा चार्ट तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल, की मार्केट नेहमीच वर चढत असताना मध्ये मध्ये खाली येते. मात्र वाढीचा संकेत हा असतो की प्रत्येक वेळी मार्केट ने गाठलेला तळ हा त्याच्या आधीच्या घसरणीपेक्षा वरच्यापातळीवर असावा. २०१८ मध्ये हेच झालेले दिसते. तत्यामुळे मार्केट ने वर्षाच्या सुरुवातीला ३३१७० वर आणि वर्षअखेरीस ३३३५० वर सपोर्ट घेतला आहे, आणि असा सपोर्ट घेतल्यावर मार्केटने रॅली केली आहे. हि रॅली अर्थात मध्यमकालीन आणि दुर्घकालीन गुंतवणूकदार अधिक जोमाने स्वीकारू शकतात.

आता मुद्दा असा, की सेन्सेक्स २०१९ मध्ये कसा वागेल? याचे उत्तर बघण्यासाठी मागील दोन वर्षांचा सेन्सेक्स चा चार्ट पहिला पाहिजे. तो अतिशय व्यवस्थित वर चढणारा आहे. १ जानेवारी २०१६ ला २५००० च्या आसपास राहणार सेन्सेक्स २०१८ ला ३६००० वर पोहोचला आहे. ह्या काळात वर खाली हेलकावे गेले, मात्र तुम्ही चार्टवर ही दोन वर्षे पाहिल्यास सेन्सेक्स ने नियमाप्रमाणे वरच्या दिशेने आगेकूच केलेली दिसेल. सलग थोड्यावरील वाढल्यावर विश्रांती पुन्हा वर चढणी असाच क्रम दिसतो, आणि हे वाढत्या मार्केटचे द्योतक आहे. थोडक्यात, पुढील वर्षी मार्केट ३६००० च्या वरची आपली आगेकूच पुढे सुरु ठेवेल हे सांगणे न लगे! पुष्टीदाखल तुम्ही एखाद्या चांगल्या इंडेक्स फंडचा मागील दोन आणि तीन वर्षांचा परफॉर्मन्स पाहावा.

आता पुढील वर्षी एक महत्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे लोकसभेच्या निवडणूका. राजकारणाचा मार्केटवर थेट परिणाम होतो कारण सबळ अर्थव्यवस्थेसाठी सक्षम राजकीय व्यवस्था असणे आवश्यक ठरते. आता राजकीय गणिते काहीही असली, तरी मार्केटचे गणित सरळ असते. अर्थव्यवस्थेसाठी चांगले निर्णय घेणारे खंबीर सरकार सत्तेवर आले की मार्केट आनंदतो. मग आता मार्केट कसे टाइम करावे? मार्केट टाइम करणे सोप्पे नाही आणि आवश्यकताही नाही. परिस्थितीप्रमाणे वागणे हे केंव्हाही अशा स्थितीत चांगले असते. त्यामुळे आपल्याकडे थोडी गंगाजळी शिल्लक ठेऊन राहावे. निवडणुकांमुळे दोलायमान स्थिती होण्याआधी प्रॉफिट होत असल्यास तो बुक करणे उत्तम, कारण अशावेळी हातात पैसे राहतात, आणि जेंव्हा निवडणुकीचे आणि त्याचे मार्केटवर होणारे परिणाम स्पष्ट होतात, तेंव्हा आपल्याला पोझिशन घेता येते.

मागील दोन वर्षांच्या अभ्यासावरून सेन्सेक्स ची आगेकूच चालू राहील हे निश्चित! मध्ये तो आपटूही शकतो, अर्थात त्याने ३३५०० ची लेव्हल पुन्हा टेस्ट करता नये. त्यामुळे जोपर्यंत मार्केट ३४०००-३४५०० तोडत नाही पडणारी फळे खाण्यासाठीच असतात हे लक्षात ठेवावे.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि हॅप्पी इन्वेस्टींग!!

Previous Article

संकल्प नववर्षाचा: सवयी बदला आरोग्य सुधारेल…

Next Article

मेरी ख्रिसमस बोलल्याने खरंच हिंदू धर्म छोटा होतो?

You may also like