मातोश्री वृध्दाश्रमात तरुणाईने रंगवली “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमाची मैफिल

Author: Share:

मुंबई: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुंज प्रतिष्ठानतर्फे खडवली येथील मातोश्री वृध्दाश्रमात “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेळ, कविता, गाणी, नृत्याच्या माध्यमातून झुंजच्या शिलेदारांनी वृध्दांसोबत स्वातंत्र्यपूर्व संध्याकाळ साजरी केली.

बादलीमध्ये चेंडू टाकणे, चिट्ठ्यांद्वारे जुनी गाणी म्हणणे अशा स्पर्धांमध्ये तेथील वृध्दांचा सहभाग तरुणाईचा स्फूर्ती देणारा होता. राहूल हरिभाऊ व जयेश शेलार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सचिन घरत याने “सुर निरागस हो” या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर सतिश गराठे, अल्केश शेलार, जयेश शेलार यांनी अनेक गाणी सादर करत उपस्थित वृध्दांना गाण्याच्या ठेक्यांवर नाचायला लावलं. कमलेश रोहणे, लखन शेलार यांनी गाण्यांना ढोलकीची सुरेख साथ दिली.

झुंज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमात सतिश मार्के, शनी अंबारे, हर्षद पाटील, शिवाजी पाटील, जयेश चौधरी, मैनुद्दीन मुल्ला, रुपेश पाठारे, किरण धुमाळ,सर्वेश भोईर, भावना कांबळे,स्नेहा कांबळे, कोमल मोहिते, अजय जाधव सहभागी झाले होते. सहभागी तरुणाईला आशिर्वाद देत वृध्दांनी झुंज प्रतिष्ठानलाही शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता ‘राष्ट्रगीताने” झाली.

Previous Article

खडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी

Next Article

आता तरी रायगडाला जाग येईल…

You may also like