Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ग्राहकांची वैयक्तिक माहिती हॅक करीत असल्याच्या गंभीर संशयावरुन चिनी मोबाईल कंपन्यांना नोटिसा

Author: Share:
ग्राहकांची वैयक्तिक माहिती हॅक करीत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने मोबाइल हँडसेटचे उत्पादन करणाऱ्या २१ मोबाइल कंपन्यांना नोटिसा बजावल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये व्हिवो, ओप्पो आणि शाओमी यांसारख्या चिनी कंपन्यांचा समावेश आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ज्या २१ कंपन्यांना नोटीस बजावली आहे, त्यांमध्ये चिनी कंपन्यांव्यतिरिक्त अॅपल, सॅमसंग आणि मायक्रोमॅक्स आदींचाही समावेश आहे. सरकारच्या मते चिनी बनावटीच्या मोबाइल कंपन्या ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजमधून वैयक्तिक माहिती चोरत आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भात १४ ऑगस्टला मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषांचे पालन करणे आणि नोटिशीवर खुलासा करण्यासाठी कंपन्यांना २८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतर कंपन्यांकडून सुरक्षाविषयक तरतुदींचे पालन झाले नाही तर  सरकारकडून ऑडिट केले जाण्याची शक्यता आहे. या ऑडिटमध्ये कंपन्यांकडून निकषांचे पालन होत नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्प्ष्ट केले.
Previous Article

ओमकार… सुदृढ आयुष्याचा महामंत्र.

Next Article

कमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय!!

You may also like