Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नोकियाचा नवीन मॉडेल, नोकिया ५ विक्रीसाठी उपलब्ध

Author: Share:

मुंबई: नोकियाचा नवीन फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली एनसीआर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, कोलकता, लखनौ, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद अशा महत्वाच्या शहरांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना २५०० रुपयांचं makemytrip.com चं कूपन मिळणार आहे. यामध्ये हॉटेल बुकिंगवर १८०० रुपयांची आणि विमान तिकिटावर ७०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय व्होडाफोन ग्राहकांना १४९ रुपयांमध्ये ५ GB डेटा मिळेल. ३ महिन्यांसाठी ही ऑफर असणार आहे.

१२ हजार ८९९ रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. ५.२ इंच स्क्रीन, फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा ३०००mAh बॅटरी क्षमता, ऑक्टा कोअर प्रोसेसर, २GB रॅम, १६ GB इंटर्नल स्टोरेज, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा हे नोकिया ५ चे फीचर्स आहेत.

Previous Article

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला केले संबोधित 

Next Article

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलची भारताला सलामी

You may also like