न्यायदानात राजकारण नको

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग याचिका काँग्रेस पक्षाने मागे घेतल्याचे कळले. काँग्रेस पक्षाने दीपक मिश्रावर महाभियोग याचिका टाकली होती. त्यांचा आरोप होता की चीप जस्टीस दीपक मिश्रा हे पक्षपातीपणाचे निर्णय देतात. तसेच ते भ्रष्टाचार करतात. जसे मेडीकल महाविद्यालयातील मान्यतेच्या प्रस्तावात घुसखोरी झाली तरी दीपक मिश्रा ने क्लीन चीट चा निर्णय दिला.

दीपक मिश्रा हे ओडीसाच्या भागात न्यायालयात काम केलेले असुन आपल्या हुशारीच्या बळावर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत मजल मारली.
ते प्रकाशझोतात मोठमोठ्या अहम निर्णयाने आले. पहिला निर्णय हा होता की देशातील सर्व सिनेमाघरात राष्ट्रगीत गुंजावे तसेच त्यासाठी देशातील सर्व नागरीकांनी राष्ट्रगीताला उभे राहावे. दुसरा निर्णय होता की फय्यारी कापी ही जनतेला लवकर प्राप्त व्हावी म्हणुन चोवीस तासात वेबसाइट मध्ये अपलोड व्हावी. तिसरा निर्णय होता की व्यक्ती का अधिकार असीमीत नाही. त्यामुळं त्याला वापरायला मनाई नको. चौथा निर्णय होता मुंबई बाँबस्फोटाबद्दल जो १९९३ ला झाला होता. या खटल्यातील आरोपी याकुब मेननच्या फाशी संदर्भात. यावेळी २९ जुलै २०१३ ला रात्री न्यायालय उघडलं. यकुबची फाशी रद्द करण्यासाठी. पण दीपक मिश्रा च्या नेतृत्वात समिती ने निर्णय दिला की ही फाशी थांबविणे म्हणजे न्यायाच्या विरोधी कृती होईल. न्यायाची खिल्ली उडविल्यासारखे होईल.

दीपक मिश्रा ला पदावरुन हटविण्यासाठी काँग्रेसने कपिल सिब्बलच्या नेतृत्वात महाभियोग आणला.ही प्रक्रिया लांबलचक व अवघड आहे तरी. शिवाय काँग्रेसचे राज्यसभा लोकसभा सदनात सदस्य कमी असतांनाही.

२०१९ ला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. दीपक मिश्रा हे ऑक्टोंबर महिण्यात रिटायर्ड होणार आहेत. तसेच आता त्यांच्याकडे अयोध्या प्रकरण व जस्टीस लोया यांच्या हत्येच्या प्रकरणाची विल्हेवाट…. ही दोन प्रकरण असल्याने महाभियोग…… कदाचित यात जस्टीस दीपक मिश्रा यांनी अयोध्या प्रकरणाचा जो कोणता असेल तो निकाल जर दिला तर कदाचित यातून भाजपा तरुन निघेल. त्यांना विजय मिळेल.
रामजन्मभुमी हा वादाचा मुद्दा. तो आजचा नाही. रामाचं अस्तीत्व होतं की नाही ते माहीत नाही पण हा मुद्दा अतिशय संवेदनशिल मुद्दा असून तो कितीतरी वर्षापासुन वादाचा मुद्दा ठरला आहे. त्याला शेकडो वर्षे झालीत. आजही तो मुद्दा संपलेली नाही. त्या प्रश्नावर कित्येक भारतीयांची जीव गेलीत. पण मुद्दा संपलेला नाही. तसाच काश्मीर प्रश्न हाही वादाचा मुद्दा.

हे मुद्दे कुठेतरी संपवायला हवे. तो कदाचित जस्टीस दीपक मिश्रा यांच्या माध्यामातुन संपू शकतो. पण पुढे राजकारण करण्यासाठी पार्ट्यांजवळ मुद्दाच राहणार नाही.शिवाय हा जर मुद्दा भाजपाने हाताळुन याचा एकतर्फी निर्णय लावल्यास आपण जे साठ वर्ष या भारतावर राज्य केलं ते राज्य पुढील काळात करता येणार नाही ही भीती काँग्रेसला असावी. कारण आपलं राज्य एवढे दिवस असुन आपण हा मुद्दा न संपविल्याने आपण श्रेय घेण्यापासुन वंचित राहलो असे कदाचित काँग्रेसला वाटणार नाही तर काय?

महत्वाचं म्हणजे राज्यकर्त्यांनी प्रथम देश पाहावा, मग राजकारण. देशहित जिथे असेल तिथे राजकारण प्रथम करावं. पण जिथे देशहित नसेल तिथे राजकारण करु नये.

आम्ही देश देश म्हणतो आणि दुसरीकडे चांगल्या गोष्टी घडू नये म्हणुन राजकारण करतो. वादाची मुद्दे आम्हीच निर्माण करतो आणि मग आम्हीच निर्माण झालेला गोंधळ निस्तारण्याचा प्रयत्न करतो. प्रथम महाभियोग आणण्याचा प्रस्ताव. मग तो परतही घेण्याचा आमचाच मुद्दा…..केवळ जनतेची दिशाभुल….

जस्टीस दीपक मिश्रा यांनी अयोध्या प्रकरण हाताळू नये का? जस्टीस मिश्राने लोया प्रकरण हाताळू नये का? पण निव्वळ राजकारणासाठी ही राजकारणी खेळी. काँग्रेसचे म्हणणे या अयोध्या प्रकरणाची सुनावणी ही निवडणुकीनंतर व्हावी. कारण निवडणुकीवर फरक पडेल. पण अशी निवडणूक म्हणता म्हणता किती निवडणुका गेल्या. ह्या मुद्द्यावर तोड काढता आला काय? तर याचे उत्तर “नाही” असेच आहे.

आता तरी देशातील राजकारणी पक्षांनी राजकारण न करता हा अयोध्या प्रश्न कसा संपविता येईल याचा विचार करावा. जेणेकरुन जनतेला तर राहत मिळेलच. पण देशातील हिंदु मुस्लीम वाद कायमचा संपविता येईल.

लेखक: अंकुश शिंगाडे
संपर्क: ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


 

Previous Article

शिवछत्रपती, रमझान, शास्ताखान आणि शस्त्रसंधी

Next Article

कर्नाटकात कमळ फुलणार…

You may also like