प्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…

Author: Share:

ठाणे: पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवकांनी युएनडिपी व नेहरु युवा केंद्र ठाणे यांच्या सहकार्याने झुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिटवाळा रेल्वेस्टेशन परिसरात प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.

रेल्वेस्टेशन परिसरात लोकांशी संवाद साधत युवकांनी त्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती दिली. माहितीपत्रके वाटुन व माहितीपर फलकांच्या माध्यमातून उपस्थित लोकांशी संवाद साधला. शिवाय टिटवाळा पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलीसांशी चर्चाही यावेळी या तरुणांनी केली. 

प्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे. व या बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी अशी प्रतिक्रिया यावेळी झुंजचे शिलेदार मैनुद्दीन मौला यांनी दिली. नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक सौ कुसुम ससाणे यांच्या मार्गदर्शनाने झुंज प्रतिष्ठानने राबवलेल्या या कार्यक्रमात जयेश शेलार, प्रमोद राऊत, मैनुद्दीन मौला, सतिश मार्के, रूपेश पाठारे, कुणाल म्हात्रे, कैलास भोईर व नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीयव स्वयंसेवक आनंद खरे व राहुल हरिभाऊ हे य सहभागी झाले होते.

Previous Article

गावाकडे पहा

Next Article

शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती

You may also like