नियतीसमोर सगळे समान

Author: Share:

आज मरणासन्न अवस्था असुनही माणसे जगत असतात. काही काही तर एवढी म्हातारी असतात की त्यांना जगावसंच वाटत नाही. ते तर स्वतःला मरण आलं पाहिजे असा अट्टाहास करीत मरण मागत असतात. पण त्यांना मृत्यू प्राप्त होत नाही. मरण देगा देवा असे म्हणत असतात.

ते मरण का मागतात? या कारणाचा शोध जर घेतला तर साधारणतः आपल्या लक्षात एक गोष्ट नक्कीच येते. ती ही की मृत्यू मागणा-यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे म्हातारी माणसं…….. या म्हाता-या माणसांचं वय झालेलं असतं. त्यांची सेवा करायला मुलं जवळ राहात नाही. असली तरी ती त्यांची सेवा करीत नाहीत. सतत आजारपण मागं लागलेलं असतं. त्यातच औषधासाठी पैसा न मिळाल्याने औषधा अभावी वेदना भरपुर होत असतात. अगदी ते अल्पावधीत मरतील अशी अवस्था. पण त्यांना मृत्यू नसतोच.

दुसरा मरण मागणा-या माणसाच्या प्रकारात तरुण व्यक्तींचं मरण मागणं. म्हाता-यांचं ठीक आहे. पण तरुणाचं मरण मागणं.एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. तरुण का बरं मरण मागतात बरे!

अलिकडे तरुणाईला नशेची भुरड पडलेली आहे. अगदी बालवयापासुन खर्रा, विडी, सिगारच्या आहारी गेली असल्याने अगदी तरुण वयात त्यांना कँन्सरसारख्या असाध्य रोगानं जखडले आहे. शिवाय चरस, गांज्याची लथ त्यांचा पिच्छा पुरवत असुन या ड्रगची सवय पडल्याने ते न मिळाल्याने जीव कासावीस होतो. अशावेळी ते तरुण मरण मागतात.एवढेच नाही तर एखादा आजारी माणुस त्याला वेदना सहन न झाल्यास तोही मरण मागतो. तसेच आमच्या भारतातील शेतक-यांचं तर विचारुच नका.तो तर मरण मागत नाही, तर चक्क आत्महत्या करुन आपला देह संपवितो.

अरुणा शानबाग सारखी कोमात गेलेली बाई, तिच्यासाठी मरण मागणारे भरपुर. पण तीला मरण येत नव्हते. ती कोमात होती तरीही. नियतीसमोर लाचार सगळं. कोणी मरण मागत असतांनाही मरण मिळत नाही, तर कोणी मरण येवु नये म्हणतात, त्यांना मरण येतं.

मी जीवनात काही असेही लोक पाहिले. जे समाजात वावरतांना चांगले राहु शकत नाही. ते वाईटच कर्म करीत असतात. लोकं ते मृत्यु पावले पाहिजे म्हणुन देवाजवळ रोज साकडे घालतात. एवढं त्यांचं कर्म वाईट असतं. पण ते अमर असल्यागत वागत असतात. कित्येकदा त्यांचे अपघात होतात. कित्येकदा त्यांच्यावर संकट कोसळतं, पण तरीही ते त्यापासुन बोध न घेता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. उलट अशी मंडळी आपण अत्याचार करायलाच जन्माला आलो असे समजुन शोषण सुरु ठेवतात. अशावेळी लोकांचे त्यांच्याबाबतीत मरण मागणे साहजिकच आहे. पण ज्याला आपण देव म्हणतो. त्याच्यासमोर सगळे समान आहेत.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


अत्याचार करणारे व अत्याचार न करणारेही.आपण कितीही अशा व्यक्तींबद्दल कितीही त्या सृष्टी निर्माणकर्त्याला साकडे घातले तरी तो तसे करणार नाही. कारण सृष्टी ही चांगल्या वाईटापासुन बनलेली आहे. जेव्हा माणुस निर्माण झाला, तेव्हा माणुस परिपूर्ण नव्हता. कोणाला पोट होतं. तर कोणाला डोकं होतं धड नव्हतं. म्हणुनच या पृथ्वीतलावर टिकाकाराची उत्पत्ती झाली. टिकाकार नसतील तर ही सृष्टी चालु शकत नाही. तसेच सुष्टी टिकविण्यासाठीही टिकाकारांची गरज. मग हे टिकाकार एखाद्याबद्दल चांगलेच बोलतील असे नाही.ते वाईट बोलणारच. मग त्यांच्यासाठी आपण कितीही वाईट विचार केला तरी त्यांना काही होणार नाही.

वाघ, सिंह हे जंगलात राहणारे प्राणी.शाकाहारी प्राण्यांचं मांस खाणारे…. त्यांना कितीही सांगीतलं समजावुन की बाबांनो तुम्ही आजपासुन मांस खावु नका. ही हिंसा आहे. यात मुक्या, निरपराध प्राण्यांचा जीव जातो. पण ते ऐकतील का? नाही ना. कारण ते जर खाल्ले नाही तर त्यांचं पोट भरत नाही. महत्वाचे म्हणजे कोणाची ना कोणाची हत्या केल्याशिवाय कोणताही जीव जगु शकत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. आपण ज्यांना शाकाहारी प्राणी म्हणतो. तेही हिरव्या झाडाची हत्या करतातच. आता आपण म्हणु की ते वाळले गवतही खावु शकतात. प्राणीही सहज मृत पावलेले प्राणी खावु शकतात. काय गरज आहे त्यांना शिकार करण्याची? काय गरज आहे त्यांना हिरवे गवत खाण्याची?आपणही का खावा हिरवा भाजीपाला? तरीही आपण खातो.मांसही खातोच. आपल्या शौकासाठी झाडांची तसेच प्राण्यांची हत्या करतो. शोषणकर्ताही असाच असतो. त्याला कोणी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरत नाही…. उलट जास्त अत्याचार करतो.

आपण अशा शोषणकर्त्याबद्दल घाबरु नये. त्याचा विरोध करावा. प्रतिकार करावा. आपण निव्वळ अत्याचार सहनच करीत राहिलो तर आपला एक दिवस मरण नाही मागीतले तरी नक्कीच जीव जाईल. कारण कसायाला विरोध न करणा-या बक-या इथे रोजच हलाल होतात पण वाघाला कसाई घाबरुन त्याची हत्या करीत नाही. वाघाला आपण घाबरतो. पण कधीकधी वाघही आपल्याला घाबरतो, हे आपण विसरु नये. प्रत्येकालाच त्यांच्या जीवन मरणाची भीती. मरण देगा देवा म्हणणे साहजिक स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्षात मृत्यु अंतीम सत्य असतांनाही आपण मरणाची हिंमत करीत नाही. कधीकधी वाघालाही एखादी म्हैस जड जाते.तसेच आपलेही आहे.

संकटे ही पाचवीला पुजलेली असतात. म्हणुन काय संकटाला घाबरुन आत्महत्या करणे काही बरोबर नाही. दुःखानंतर सुख येणारच. पण आजच्या दुःखाला घाबरुन त्यापासुन पळ काढणे बरोबर नाही. अलिकडे निसर्गाच्या जाचाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. म्हणुन मरणानंतर शेतक-यांच्या घरचे दुःख संपते काय? अलिकडे शिक्षकही संचालक, मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. याने प्रश्न संपत नाही.संकट तर येणारच. पण त्या संकटाला न घाबरता जे दोन हात करण्याची तयारी ठेवतात. त्याला संकट घाबरतं.

शोषण होणारच. त्यात वेदनाही. अगदी मरणप्राय वेदना. पण त्या वेदना होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतलेली बरी. वेदना संकट घेवुन येतात. पण ह्या वेदनावर व शोषणावर उपाय म्हणुन न्युटनचा एक नियम लक्षात ठेवावा किंवा गँलिलिओचा तरी गुरुत्वाकर्षणाचा नियम लक्षात घ्यावा. आपण एखादी वस्तु वर फेकल्यास ती तेवढ्याच वेगाने खाली येते. शोषण करणारे शोषण करतीलच, पण ते तेवढ्याच लवकर समाप्तही होतील. हेही लक्षात घ्यावे. खर्रे, गांज्या अफु ड्रग हे शरीराचा घात करणारे घटक नाही खाल्ले तर कँन्सर होणार नाही. म्हाता-या माणसांना म्हातारपणी मरण येत नाही, ते मरण मागतात तरी…….पण त्यांना मरण मागण्याची आवश्यकता काय?पण आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा मायबापांना त्रास देतो. ते आपले मायबाप म्हातारे असतात तेव्हा त्यांनी मरण मागावे एवढा त्रास आपण त्यांना देतो. मग आपण म्हातारे झाल्यावर मुले जर आपल्यावर अत्याचार करीत असतील तर त्याला जबाबदार कोण? मग आपण का पश्चाताप करावा?आपण मुलांना का दोष द्यावा? खरं तर आपले कर्म जर चांगले असले तर नियतीजवळ मरण मागण्याची आवश्यकता नाही. नियती न्युटनच्या नियमानुसार चांगल्या वाईट कर्माची शिक्षा आपल्याला देतच असते. म्हणुन आपले कर्म चांगले ठेवलेले बरे! शोषण करणा-यांना शोषण करु द्या. पण तुम्ही घाबरुन न जाता, वेदना सहन न करता शोषणाविरुद्ध लढा. प्रतिकार करा. विजय तुमचा नक्कीच होईल. पण तेव्हापर्यंत संयम ठेवण्याची गरज आहे.

मित्रांनो नियतीसमोर कोणीही सुटलेला नाही. शेतकरी मेला म्हणुन प्रश्न मिटत नाही. शिक्षक मेला म्हणुन समस्या सुटत नाही. आपण शोषण केले म्हणुन आपलेही शोषण होणार नाही. मायबापांना त्रास दिला म्हणुन आपल्याला त्रास होणार नाही. असे कोणीही समजु नये. नियतीसमोर सगळे समान आहेत. सुखानंतर दुःख येतंच. दुःखानंतर सुखही. नियती ही ब-या वाईट कर्माची फळं आपल्याला देतच असतो. म्हणुन नियतीवर विश्वास ठेवुन कोणी कोणावर अत्याचार करु नये. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार नियतीने प्रदान केलेला आहे हे सर्वांनी आत्मसात करावे.

लेखक: अंकुश शिंगाडे लेखक, नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

शिवसेना-भाजप युती झाली नाही तर…

Next Article

चिदंबरम, रिबेरो आणि ख्रिस्ती लॉबी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

You may also like