Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

इतिहास संशोधक निनाद बेडेकर

Author: Share:

प्रसिद्ध इतिहास संशोधक निनाद बेडेकर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक संशोधक आणि शिवचरित्राचे व्याख्याते होते. शिवचरित्राशी संबंधित विविध पैलूंचा त्यांचा गाढा अभ्यास होता. विशेषतः कवी भूषणाचे छंद हे त्यांचा विशेष आवडीचे विषय होते.

१९८७ मध्ये किर्लोस्कर कमिन्स कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेत पूर्णवेळ मराठी इतिहास संशोधन आणि भटकंतीला सुरुवात केली. त्यांनी  देशविदेशांत सुमारे साडेतीन हजार व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश; तसेच परदेशातील ७५ किल्ल्यांवर त्यांनी विशेष संशोधन केले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंवर लिखाण केले होते.

त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. शिवचरित्रासोबत पेशवाईचाहि त्यांचा अभ्यास होता. केवळ अभ्यास आणि व्याख्यानांमध्ये न राहता, दृश्य परिणामातून इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांचे प्रयत्न होते. शनिवारवाड्यातील प्रसिद्ध’लाइट अँड साउंड शो’ त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरला आहे. ‘पेशवाई’ या मालिकेचे लिखाण त्यांनी केले होते.

भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे या संस्थांचे ते आजीव सदस्य तर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि महाराष्ट्र कलोपासक या संस्थांचे अध्यक्ष होते. वर्तमानपत्रे, मासिके या माध्यमातून ते सातत्याने इतिहासावर लिखाण करत होते. त्यांनी २५ शोधनिबंधही लिहिले होते.गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये निनादरावांनी तरुण आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.

१० मे २०१५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

निनाद बेडेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अजरामर उद्‌गार (ऐतिहासिक)
  • आदिलशाही फर्माने (ऐतिहासिक; सहलेखक – गजानन मेहंदळे, डॉ.रवींद्र लोणकर
  • गजकथा (ऐतिहासिक)
  • छत्रपती शिवाजी (चरित्र)
  • झंझावात (ऐतिहासिक)
  • थोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)
  • बखर पानिपत ची (मूळ लेखक – रघुनाथ यादव चित्रगुप्त, इ.स. १७६१)
  • विजयदुर्गाचे रहस्य (पर्यटनविषयक)
  • शिवभूषण (ऐतिहासिक)
  • समरांगण (बालसाहित्य)
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स आणि विकिपीडिया
Previous Article

मराठी ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते

Next Article

जगन्नाथ रघुनाथ आजगावकर

You may also like