निमगाव (वा) येथे कृषीदुतांचे आगमन

Author: Share:

नाशिक(उत्तम गिते): महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय बाभुळगाव च्या कृषीदुतांचे निफाड तालुक्यातील निमगाव (वा) येथे नुकतेच आगमन झाले आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत हे कृषीदुत गावातील शेतक-यांचे आणि विकासाचे उपक्रम राबविणार आहेत.

सरपंच मधुकर रामचंद्र गायकर, उपसरपंच लताबाई सोनवणे, ग्रामसेवक अजय भाऊ आव्हाड सहकार्य या कृषिदूताना लाभणार आहे. हा कार्यक्रम जुन ते ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येतो.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश राऊत, प्रा.नितिन शिंदे तसेच प्रा.रोहिणी नरोटे, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व इतर प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये गटप्रमुख नितीन माने,नंदलाल पवार, अतुल काकडे, अनिल साई, आशिष रामटेके, अजिंक्य शेलार, अमोल साबळे या कृषीदुतांचा समावेश आहे.

Previous Article

पीएचडी – अजून खूप काही भाग २

Next Article

पहिली आणीबाणी आठवावी !

You may also like