पुणे येथे नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक श्री.निलेश राणे यांचा जनसेवा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Author: Share:

लोक कला सेवा ट्रस्ट द्वारे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, हा सोहळा पुण्यातील रजवाडे हॉल येथे ५ नोव्हेंबर २०१७ रोजी संपन्न झाला त्यात क्रीडा क्षेत्रातील एकमेव जनसेवा राष्ट्रीय पुरस्कार नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक श्री.निलेश राणे यांना मिळाला.

निलेश राणे यांनी आपल्या जीवनांतील काही दिवस ते आपल्या राज्यातील गरीब खेळाडूंसाठी देत असतात, ते आपल्या सर्व खेळाडूंना आपल्या परीवाराप्रमाणे वागवत असतात त्यांना वेळोवेळी अचूक मार्गदर्शन देऊन त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाचे प्रशिक्षण देत असतात, आणि त्यांचे खेळाडू पण त्यांना उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय व राज्य पातळीपर्यंत पोहचतात. हे सर्व कामगिरी बघत असतांना राज्यातील खेळाडूंनी त्यांना युवा क्रीडा मार्गदर्शक म्हणून उपाधी सुद्धा दिली आहे, श्री.राणे सांगतात कि जो सन्मान माझा होत आहे तो माझा नव्हे तर माझ्या सर्व खेळाडूंचा आहे. तसेच या जनसेवा राष्ट्रीय पुरस्काराचा मान श्री.राणे यांनी या वर्षी त्यांच्या खेळाडूंना दिला व हा पुरस्कार त्यांच्या खेळाडूंनी स्वीकारला.

या पुरस्काराचे वितरण मा.श्री.धनंजय महाडीक (खासदार,कोल्हापूर) सोबत श्री.शशिकांत पेडवाल (प्रती अमिताभ बच्चन), प्रा.एन.अपामार्जाने (राष्ट्रीय कीर्तनकार), श्री.संजय लोंढे (संगीतकार), राधिका पाटील (अभिनेत्री), सौ.आशा नाईक (शिक्षणतज्ञ) या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

Previous Article

मृत्यूचा स्वीकार

Next Article

ज्योतिष आणि आध्यात्मिक शास्त्र : डॉ. मो. शकील जाफरी

You may also like