जागतिक युथ कॉमनवेल्थ वेटलिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती निकीता काळेचे मनमाड येथे स्वागत

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – ११ ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या जागतिक युथ कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवुन आलेल्या निकिता काळे हिचे मनमाड शहरात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना मनमाड शहराच्या वतीने तिचा व प्रशिक्षक व्यवहारे सर यांचा शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर यांनी सत्कार केला.

यावेळी शिवसेनेचे हर्षल पाटील, अमोल पांडे, राजू मावरे, शुभम चव्हाण, अरुण नगे, छोटु भडके, दादा सूर्यवंशी, छोटु खोंड, निशांत पाटील, महेश पगार, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सुवर्णपदक विजेती निकिता काळे व प्रशिक्षक व्यवहारे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जयघोष करण्यात आला.

फोटो ओळी:- सुवर्णपदक” विजेती निकिता काळे व प्रशिक्षक व्यवहारे सर यांचा शिवसेना मनमाड शहराच्या वतीने सत्कार करताना

बातमी: प्रा. सुरेश नारायणे

Previous Article

सांगली कारागृहात संवाद बंदीजनांशी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन

Next Article

आचार्य विनोबा भावे अर्थात विनायक नरहरी भावे

You may also like