Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

उद्या बाजारामध्ये येणार २०० ची नवी नोट

Author: Share:

केंद्र शासन दोनशे रुपयाची नवीन नोट बाजारामध्ये आणण्याची बातमी मागील महिन्यात आली होती. हि नवी नोट उद्या बाजारामध्ये येईल असे रिझर्व्ह बँकेने प्रेस रिलीज द्वारे जाहीर केले. उद्या बँका बंद असल्याने ही नोट कदाचित परवा लोकांच्या हाती पडू शकेल.

गडद पिवळसर रंगाची ही नोट असेल असे प्रेस रिलीज सांगते. त्यावर मागील बाजूस सांची स्तूपाचे चित्र असेल. ६६*१४६ मिमी चा आकार असेल.

त्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ, गांधीजी आणि २०० एकदा इंग्रजी आणि देवनागरीत असेल. रिझर्व्ह बँक, भारत आणि इंडिया तसेच २०० एकदा लहान स्वरूपात असेल. अंध व्यकरींसाठी गांधीजींचे चित्र, अशोक स्तंभ, इंगजी H अक्षर आणि लहान अक्षरातील २०० आकडा उठावदार असेल. मागील बाजूस सांची स्तूपाचे चित्र, स्वच्छ भारत लोगो आणि देवनागरी २०० आकडा तसेच नोट प्रिंट करण्याचे वर्ष डावीकडे असेल.

Previous Article

गणपती स्थापनेच्या पुर्वसंध्येला पावसाचे जोरदार आगमन

Next Article

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! प्रत्येक मनुष्याची गोपनीयता (प्रायव्हसी) हा संविधानाच्या २१व्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार!

You may also like