Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

दसऱ्याच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोतांचे सीमोल्लंघन?

Author: Share:

पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून गच्छंती करण्यात आलेले संघटनेचे नेते सदाभाऊ खोत शेतकऱ्यांसाठी नवीन संघटना उभारत नवीन डाव मांडत असल्याचे वृत्त पुढे येते आहे.  शेतकऱ्यांसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असून त्यासाठी नवी शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले.

या नवीन संघटनेचे नाव अद्याप ठरवलेले नसून त्यासाठी कार्यकर्त्यांकडून सूचना मागवण्यात आल्याचे समजते. राज्यभरातील शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाव घोषित केले जाईल, अशी शक्यता आहे.

Previous Article

चिनी ड्रॅगन विरुद्ध आर्थिक युद्ध

Next Article

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

You may also like