रिझर्व्ह बॅंक आणते आहे पन्नास रुपयाची नवीन नोट

Author: Share:
दोन हजार रुपयाची नवीन नोट बाजारात रुळते आहे, तोच अजून एका नवीन नोटेचे पडघम वाजू लागले आहेत. पन्नास रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येत आहेत. पण, सध्या चालू असलेल्या नोटा बंद होणार नाहीत. याआधी २०० रुपयाची नवीन नोट लवकरच बाजारात येण्याचेही सूतोवाच झाले होते.
पन्नास रुपयाच्या नवीन महात्मा गांधी सीरिजच्या नोटा लवकरच बाजारात आणल्या जातील असे आज रिझर्व्ह बँकेने प्रेस रिलीज द्वारे घोषित केले. परंतु सध्या चालू असलेल्या ५० च्या नोटांना यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यासुद्धा बाजारामध्ये कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील असे प्रेस रीलिजमध्ये सांगितले गेले आहे.
फ्लोरोसंट ब्ल्यू रंगात या नवीन नोटा असतील. त्याच्यावर मागच्या बाजूला हंपी येथील मंदिराचे (रथाचे) चित्र असेल. पुढील बाजूला महात्मा गांधींचे चित्र असून त्यावर भारत आणि India आणि दोन्ही बाजूला ५० इंग्रजी आणि देवनागरी लिपीत असतील. अशोका चिन्ह माही स्वच्छ भारतच लोगो असेल. नोटेचा आकार ६६*१३५ mm  असेल.
Previous Article

१९ ऑगस्ट

Next Article

उत्सवाचा कुत्सव होऊ नये…

You may also like