Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव महाविद्यालयात नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

Author: Share:

नांदगाव: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक विभागीय आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या व मुलींच्या नेटबॉल स्पर्धा मविप्रच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाल्या. नुकत्याच झालेल्या मविप्रच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडुन आलेले नांदगाव तालुका संचालक दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दामुआण्णा डघळे, गोरख देवराम आहेर, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, नाशिक विभागीय क्रिडा सचिव प्रा.लहानु कांदळकर, संघव्यवस्थापक प्रा.बाजीराव पेखले, प्रा.सोपान जाधव, प्रा.शिरीष नांदुर्डीकर, प्रा.प्रदिप वाघमारे, प्रा.स्वनिल कर्पे, प्रा.संतोष पवार, प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल उपप्राचार्य संजय मराठे, प्रा.आर.टी देव रे यावेळी उपस्थित होते.

मुलींच्या नेटबॉल स्पर्धेत एस. व्ही.के.टी देवलाली कँम्प महाविद्यालयाने के.टि.एच.एम. नाशिक महाविद्यालयाच्या संघाला १४-११ च्या फरकाने पराभव करून दे. कँम्प महाविद्यालय अंतिम विजेता संघ ठरला. तर के.टी.एच.एम नाशिकला संघ उपविजेता राहिला तर मुलांच्या नेटबॉल स्पर्धेत एल.बी.एच.पंचवटी महाविद्यालय व एस.व्ही.के.टी देवलाली कँम्प महाविद्यालय यांच्यात अंतिम सामना झाला. यात २४-८ या फरकाने देवलाली कँम्प महाविद्यालयाने पंचवटी महाविद्यालयाचा पराभव केला व दे. कँम्प महाविद्यालय अंतिम विजेता ठरला या स्पर्धेतुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी नाशिक विभागाचा मुली व मुलांचा संघ निवडण्यात आला.

प्रा.स्वप्नील कर्पे, दीपक पवार, संकेत कदम यांनी या स्पर्धांचे पंच म्हणुन काम पाहीले. तर प्रा. दिनेश उकिर्डे व प्रा.बी.पी. शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले, तर स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलीप अहिरराव, शुभम आहेर, अनिल हातेकर, सुरेश पवार व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी: प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव

Previous Article

नांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला

Next Article

नारायण… नारायण…

You may also like