Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

श्री निलमणी गणेश मंदीर भाद्रपद महागणेशोत्सवाचे यंदा २१वे वर्ष; भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) : मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन १९९७ पासून सलग २१व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०१७ ते ०५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सलग १२ दिवस भाद्रपद महागणेशोत्सवाचे आयोजन यंदाही करण्यात आले आहे. मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे साजरा केला जातो.

यंदा दि. २५ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ९.३० वा. श्री निलमणी गणेशाच्या पार्थिक मुर्तीची पुणेरी पध्दतीने स्थापना मिरवणुक निघणार असून गावप्रदक्षिणा करुन सकाळी ११.३० वाजता मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने श्री निलमणी गणेश मंदीरात विधीवत स्थापना विधी संपन्न होणार आहे. तर शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी मंदीरात श्री सत्याविनायक महापुजेचे आयोजन दुपारी २.३० वाजता करण्यात आले असून त्याच दिवशी दुपारी ४.०० ते रात्री १०.०० पर्यंत महाप्रसाद (अन्नपूर्णा महासेवा) संपन्न होणार आहे.

तसेच रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन भोग महाप्रसाद (अन्नपूर्णा महासेवा) महानैवेद्य कार्यक्रम होणार आहे. तसेच बारा दिवस उत्सव काळात सकाळी ६.०० वा.श्री निलमणीस महाअभिषेक तर रात्री ८.०० वाजता श्री निलमणीची सामुहिक महाआरती अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. दररोज होणार्‍या महाअभिषेक व महाआरतीच्या प्रसंगी सामुहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे. तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे नम्र विनंती आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

बातमी : प्रा. सुरेश नारायणे

Previous Article

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! प्रत्येक मनुष्याची गोपनीयता (प्रायव्हसी) हा संविधानाच्या २१व्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार!

Next Article

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त नांदगाव मध्ये ‘करिअर फेअरचे’ आयोजन

You may also like