नवरात्रात करावयाची देवीभक्ती

Author: Share:

आश्विन प्रतिपदेच्या रात्री पासून नवमीची रात्र संपून दसरा लागे पर्यंतचा कालावधी कुलदेवीच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला आहेत. या कालावधीत सर्व जातींच्या हिंदूंना करता येईल अशी भक्ती.

१) हे दहा दिवस कांदा लसूण, अपेय, मांसाहार, म्लेंच्छांनी निर्माण केलेले पाव, केक, बर्गर वगैरे पदार्थ खाऊ पिऊ नयेत.

२) पहिल्या दिवशी कुलदेवीच्या नावाने घट बसवावा (म्हणजे कलश व त्यात पाणी सुपारी नाणे आंब्याचे डहाळे घालून नारळ ठोवावा) किंवा देवीचा टाक किंवा फोटो किंवा तुमच्या कुलदेवीच्या स्थानी असलेल्या पाण्याच्या कुंडातील किंवा नदी किंवा झर्यातील एक छोटा खडा कुलदेवी म्हणून ठेवावा.

३) रोज पहाटे उठून देवीला  कुंकू, एक फूल, धूप, निरांजन ओवाळून, भाजलेले चणे व गूळ तसेच एक फळ अर्पण करावे.

४) जमत असेल तर देवीसमोर नऊ रात्र अखंड दीप लावावा. (दिव्याचे तेल खायला वापरतात असे कोणतेही चालेल, फक्त डालडा वगैरे नको)

५) जे इच्छुक असतील त्यांनी 9323556041 या वॉस्सपवर कळवावे त्यांना कुदेवीचा एक विशिष्ट पाठ पाठवू तो वाचावा.

६) रोज दुपारी व रात्री  “सुखकर्ता दुःखहर्ता” आरती म्हणून नंतर “दुर्गेदुर्घट भारी” ही आरती म्हणून मग पसायदान म्हणून फूले वहावीत.त्यानंतर  प्रदक्षिणा नमस्कार करावा. तुमच्या कुटुंबियांच्या, हिंदूंच्या, आपल्या भारत देशाच्या व सर्व जीवांच्या भल्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.

७) अंबाबाईचा उदो उदो या नाममंत्राचा १०८ वेळा जप करावा.

८) जमल्यास अष्टमीचा तरी पूर्ण दिवस कडक उपास धरावा.

९) नवरात्रातील एक दिवस तरी स्वजातीतील (जिचे आई वडील एका जातीचेच आहेत) कुमारीका बोलवून तिला कुंकू लावून दक्षिणा वेणी फणी बांगड्या व काही खाऊ द्यावा. तसेच स्वजातीच्या विवाहाच्या सवाष्ण (विधवा पुनर्विवाह झालेली किंवा डायव्हर्स करून पुन्हा विवाहित झालेली नाही)  बाईस हळद कुंकू फून देऊन घरी बोलावून दक्षिणा नारळ सुपारी धान्य खण देऊन  ओटी भरावी.

एवढे घरी करावे…

उगाच कुठे रांगा लाऊन दगदग करून दर्शनास जाण्यात वेळ व शक्ती घालवण्या एेवजी घरचे घरी कुलदेवीची शक्ती वाढवा.

सरकारी ताब्यातील मंदिरांमध्ये देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा लिलाव होतो, नारळ हार बांगड्या पुन्हा कुठे जातात हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून सरकारी देवी मंदिरात जाऊन ओटी ठेवण्यापेक्षा मंदिरातच एखाद्या सात्विक सवाष्णीची देवी समजून ओटी भरा व देवीला जी दक्षिणा अर्पण करायची ती तिलाच अर्पण करा एवढे पुरे. हल्ली बाजारात बहुधा मिठाई मिळते. न जाणो ती किती जुनी व शिळी असेल ! कोणी बनवली असेल ! त्याला मुंगीसुद्धा लागत नाही. त्यामुळे नजाणे ते किती शुद्ध असतात. म्हणून कोणाकडे दर्शनार्थ जायचे असल्यास दूषित पद्धतीने बनवलेली मिठाई न नेता, देवीला प्रिय असलेले पदार्थ म्हणजे चणे व गूळ, लाह्या, विड्याची २ पाने सुपारी, फूल व दक्षिणा  यांपैकी काही चांगले पदार्थ न्यावेत. त्याने देवी खर्या अर्थाने प्रसन्न होईल.

या उत्सवात देवीची भरपूर भक्ती तुमच्या कडून घडावी यासाठी धर्मसभेद्वारा ही सूचना देत आहोत.

लेखक:

वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य.

राष्ट्रीय अध्यक्ष – धर्मसभा

स्थायी अध्यक्ष – विद्वत्संघ.

 

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

 

Previous Article

नांदगाव तालुका क्रिडा कार्यालयाद्वारे क्रिकेट स्पर्धा संपन्न

Next Article

नांदगाव ग्रामदैवत एकविरा माता नवरात्री उत्सवास सुरुवात

You may also like