नाशिक शहरात पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर छापे बारा जुगाऱ्याना अटक

Author: Share:

नाशिक(उत्तम गिते): नाशिक शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले बारा जुगाऱ्याना अटक केली आहे़ या जुगाऱ्याकडून त्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.जुगार्यावर कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरातील सिद्धी टॉवरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि २६) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी बाळू पगारे व त्याचे चार साथीदार कल्याण मटका नावाचा जुगार खेळत होते़ या जुगाऱ्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळागावात करण्यात आली़ सजरा गल्लीतील जुगार अड्ड्यावर दुपारच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित शेख अब्दुल पठाण व त्याचे दोन साथीदार पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते. या संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई भद्रकालीतील ठाकरे गल्लीत करण्यात आली़ पिंपळचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला संशयित निलेश शेलार व त्याचे तीन साथीदार ताडी दुकानाजवळील बोळीत मटका जुगार खेळत होते या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Article

शिक्षक मतदारसंघ; आज मतमोजणी

Next Article

सुरु झालिया पेरन..!

You may also like