सायवा “मिसेस नाशिक आयकॉन–२०१८ ची विजेती स्वाती रनाळकर”

Author: Share:

सायवा पुरस्कार सोहळा-२०१८ संपन्न

स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेलफेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली १ ली जिल्हास्तरीय “मिसेस नाशिक आयकॉन-२०१८ या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक २१ जानेवारी २०१८ रोजी विश्वास लान्स ,गंगापूर रोड येथे घेण्यात आली यामध्ये प्राथमिक फेरीत निवडून आलेले ५० स्पर्धकांनी कौशल्य दाखविले त्यात तीन फेरी म्हणजेच सांस्कृतिक, वेस्टर्न आणि प्रश्नमंजुषा हे होते, प्रत्येक स्पर्धकांनी चांगल्या व उत्कृष्ट प्रकारे आपली कला सदर केली त्यात वेगवेगळ्या प्रकारात बेस्ट सब टायटल दिले गेले त्यासोबत सन्मानचिन्ह व मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसे देण्यात आले

तसेच पहिली सायवा मिसेस नाशिक आयकॉन-२०१८ ची विजेती मिस.स्वाती रनाळकर ठरली तिला मिस टीन युनिव्हर्स श्रिया तोरणे यांच्या हस्ते विजेता मुकुट बहाल करून आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात आले व सोबत उपविजेता मिस.अनघा धोपकर आणि मिस.गुंजन पुरोहित, मिस.प्रियंका घोगरे या यांनी तिसरा क्रमांकावर आपले नाव कोरले त्यावेळी व्यासपीठावर मिस.इंडीया इंटरनेशनल मिस.शिल्पी अवस्थी, व मिस.महाराष्ट्र विजेता असलेल्या मिस.पूनम बेडसे, मिस.सयाली राउत, राष्ट्रीय खेळाडू प्रेरणा राणे या उपस्थित होते

तसेच या स्पर्धेत सायवा (महाराष्ट्र) यांच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सुद्धा केले होते त्यात भागीरथी विशेष व प्रेरणा आणि प्रज्ञावंत या नावाने पुरस्काराचे वितरण झाले त्यात भारतातून १३ वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची निवड करून त्यांना या तिन्ही पुरस्काराने गौरविण्यात आले त्यात समाजसेवा,शिक्षण,सांस्कृतिक,क्रीडा,पत्रकार,उद्योग या क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सायवाचे महासचिव श्री.निलेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

या स्पर्धेचे उदघटना प्रसंगी श्री.विश्वास ठाकुर (विश्वास बैंक),भारतीय खेळाडू कु.सोनिया शिंदे, अभिनेत्री कु.अस्मिता मीराणे, डॉ.राज नगरकर, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, ज्येष्ठ समाजसेविका सौ.सुशीलाबाई साळुंके, श्री.मधुकर राणे (वारकरी सांप्रदाय) व डॉ.प्रशांत भुतडा हे मान्यवर उपस्थित होते तसेच स्पर्धेचे आयोजक आणि जिल्हासचिव सौ.प्रज्ञा तोरस्कर व श्री.समीर तोरस्कर यांनी मान्यवरांचे आभार मानले

सोबत दोन फोटोमध्ये –

पहिली सायवा मिसेस नाशिक आयकॉन-२०१८ ची विजेती सौ.स्वाती रनाळकर ठरली त्यावेळी तिचा सन्मान करतांना मिस.टीन युनिव्हर्स श्रिया तोरणे मिस.इंडीया इंटरनेशनल मिस.शिल्पी अवस्थी, व मिस.महाराष्ट्र विजेता असलेल्या मिस.पूनम बेडसे, मिस.सायली राउत आणि राष्ट्रीय खेळाडू प्रेरणा राणे सोबत दुसऱ्या फोटोमध्ये सायवा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेते सोबत सायवाचे महासचिव श्री.निलेश राणे

Previous Article

माझे इंजिनीरिंगचे प्रयोग

Next Article

२६ जानेवारी

You may also like