नसतेस घरी तू जेव्हां

Author: Share:

नसतेस घरी तू जेव्हां, जीव हलका हलका होतो
मन फुलून बहरून जाते, फुलपाखरू बनुनी उडते
लवकर उठण्याची कटकट नाही, आंघोळीची भुण भुण नाही
आज दाढी ला हि सुट्टी, अन टिफिन ला हि बुट्टी
नसतेस घरी तू जेव्हा…
मित्रांसंगे मस्त मारुया गप्पा
रात्री जाऊया सिनेमा
बार मधे जाऊन बसूया
मद होशीत धुंद होऊया
मदनिका सवे नाचूया
ब्रम्हचारी दिवस जगू या
नसतेस घरी तू जेव्हा…
पण पण…
रात्रीचा घरी मी आलो
अंधार खायला उठला
भयाण शांतते मध्ये
बाळूचा चेहेरा आठवला
बांगड्यांची किण किण नाही
चिनूच्या गोष्टीची भुण भुण नाही
रात्रीचा झोपलो नाही
तुज वीण मी एकटाच आहे
संपूर्ण नाही अर्धाच आहे
पुरे झालं तुझं माहेर पण
पुरे झालं माझं एकटे पण
नसतेस घरी तू जेव्हा
जीव एकटा एकटा होतो
जगण्याचे कारण न उरते
संसार अधुराच असतो

सौ अर्चना कुलकर्णी बदलापूर

Previous Article

पेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…

Next Article

बापं…

You may also like