Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव-मनमाड मधील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी व वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य अभियंतांशी चर्चा

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – मनमाड मध्ये वाढत चाललेल्या अपघातांची मालिका त्यामध्ये निष्पाप बळी जात असल्याचे पाहता शहर हद्दीतून जाणाऱ्या राज्य महामार्गाला बायपास (उपमार्ग) व दुहेरी पुलांपैकी एक पुल वाहतुकीस बंद केल्यामुळे एकेरी वाहतुतिने होणारी कोंडी व अपघात लक्षात घेता या पुलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या सोडवणुकीसाठी जिल्हाप्रमुख सुहासअण्णा कांदे यांच्या नेतृत्वात मनमाड शिवसेना नगरसेवकांचे शिष्टमंडळ, गटनेता, शहरप्रमुख यांच्यासह मा.मुख्य अभियंता (5 जिल्ह्याचे मुख्य) पगारे सो, अधीक्षक अभियंता हांडे कार्यकारी अभियंता आहिरे व सहाय्यक अभियंता यांच्या सोबत बांधकाम भवन, नासिक येथे बैठक होऊन 1 तास सविस्तर चर्चा झाली.

यावेळी निवेदनही देण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन सर्व परिस्थितीच्या पाहणीसाठी वरिष्ठ अधिकारी यांची टीम स्वतः येऊन पहाणीही करणार असल्याचे सांगितले. तसेच हा पूल व भविष्यात रेल्वे वरील पूल याचीही पाहणी करून घेतली जाणार आहे. शहर हद्दीतील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावेळी करणार असल्याचे सूचित केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

मुबंईत जे जे मार्गातील इमारत कोसळली

Next Article

आपल्या मुलांची जीवनशैली अशी असावी.

You may also like