Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथील सम्राट बहुउद्देशिय गणेश मंडळाने केले मोफत नेत्र तपासणी शिबीरीचे आयोजन

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव गांधी चौक येथिल सम्राट बहुउद्देशीय गणेश मित्र मंडळ व ज्योती ऑप्टिशियन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नेत्र तपासणी साठी मालेगाव येथिल ओम हॉस्पिटल नेत्रालय चे डॉक्टर सुदर्शन पाटील यांनी आधुनिक संगणकाद्वारे नेत्र तपासणी केली या शिबिरात सुमारे २०० लोकांनी सहभाग नोंदवला. नांदगाव येथिल आठवडे बाजार असल्याने ग्रामिण भागातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला तसेच गेल्या २० वर्ष्यापासून अखंड अन्नदान भांडाऱ्याचे आयोजन केले जात आहे.

त्यासोबत प्रत्येक वर्षी नवनविन देखावे, मोदक स्पर्धा लकी ड्रॉ स्पर्धा ईत्यादी नविन स्तुत्य उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात ह्या वर्षी लहान थोरांना आवडणारा राजस्थानी कटपुतली नृत्य  देखावा मंडळाने सादर केला आहे. सम्राट बहुउद्देशीय मित्र मंडळाने गेल्या काही वर्षात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले आहे व मंडळाच्या वतीने देणगी रकमेतून गणपतीचे सोन्या चांदीचे दागिने हे मंडळाचे आकर्षण ठरत आहे. सदर नेत्र तपासणी शिबिरासाठी साठी प्रदीप गुप्ता, ज्योतिप्रसाद अग्रवाल, विनोद घोडके, अक्षय मैद, महेश भाबड, जयेश खत्री, सागर नाशिककर, राजेश गायकवाड, सतिष गायकवाड, राकेश मैद व मंडळातील सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

व्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेचे नांदगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान

Next Article

पाच दिवसांपासून ठप्प असलेली आसनगाव रेल्वे वाहतूक अखेर सुरु

You may also like