Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित करिअर फेअर उत्सहात संपन्न

Author: Share:

नांदगाव (प्रतीनिधी) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या शतक महोत्सवानिमित्त व्ही.जे.हायस्कूल व छाजेड विद्यामंदिर विद्यालयाच्या वतीने करिअर फेअर उपक्रमाचे आयोजन केले होते. विविध करिअर क्षेत्रात कार्यकरून नामवंत झालेल्या या दोन्ही शाळेत शिक्षण घेतलेल्या चार माजी विद्यार्थ्यांच्या जाहीर मुलाखती घेण्यात आल्या.नांदगाव सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात शिक्षण घेवून, उपलब्ध सुविधा, वाटचालीत आलेले अडथळे, पहिल्या प्रयत्नात अपयश आले असताना या नैराश्यावर जिद्दीने व कष्टाने मात करून गाठलेले यशाचे शिखर, ते सध्या ज्या क्षेत्रात काम करत आहेत, त्या क्षेत्रात उपलब्ध संधी प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन असे विविध पैलू उलगडत रंगलेल्या मुलाखतींनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. चारही मुलाखती ऐकतांना सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाली होती. अनेक पालकांनी सुद्धा आपल्या शंकाचे समाधान करून घेतले. विद्यार्थ्यांनी देखील या माजी विद्यार्थ्याशी दिलखुलास संवाद साधला व अनेक बेधडक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले, आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरलेल्या करिअर फेअर मधून खूप काही शिकायला मिळाल्याची प्रतिक्रिया ललित पांडव व धनश्री जोशी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त केल्या. पालकांच्या वतीने भास्कर कदम यांनी मनोगत व्यक्त केले व नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील विदायार्थ्यांसाठी असा प्रेरणादायी उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेला धन्यवाद दिले.

शाळेचे माजी विद्यार्थी अमोल निकम –तहसीलदार जळगाव यांनी आपल्या मुलाखतीतून प्रशासकीय सेवा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन केले, विद्यार्थी असताना उत्कृष्ट खेळाडू होतो त्यामुळे संयमाने यश-अपयशाला डगमगता सामोरे गेल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेत नियमित सहभाग घ्यावा व आपले ध्येय निश्चित करावे असे सांगितले. डॉ.नेहा वैद्य यांनी आपल्या मुलाखतीतून पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.पालकांनी आपल्या पाल्यावर अतिरिक्त अपेक्षेचे ओझे कधीच लादू नये तसेच त्याचा करिअर क्षेत्रातील कल ओळखून त्यांना प्रोहत्सान द्यावे असे सांगितले तसेच आपण कितीही कार्यमग्न असाल तर दिवसातून एकदा आपल्या मुलांबरोबर जेवण करा, त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्या अडचणी समजून घ्या अशा मौलिक सूचना केल्या या दोन मुलाखती विद्यालयाच्या शिक्षिका कु.वृषाली गढरी यांनी आपल्या वक्तृत्व शैलीनी रंगविल्या तसेच रॅपीड फायर राऊंड घेवून या माजी विद्यार्थ्यांच्या खाजगी व शालेय जीवनातील गमतीदार प्रसंगांना उजाळा दिला.

शाळेची माजी विद्यार्थिनी कु.अश्विनी आहेर या जि.प. च्या सर्वात तरूण सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, आर्किटेक असताना सुद्धा राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे,तसेच आज तरुणांनी देखील समाज सेवेसाठी राजकारणात येण्याचे आवाहन केले. तसेच संपूर्ण नांदगाव तालुक्यात एक लक्ष झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. चौथी मुलाखत कु.क्षितिजा कदम या माजी विद्यार्थिनीची झाली तिने आपल्या मुलाखतीतून मास कम्युनिकेशन व इव्हेंट मॅनेजमेंट या थोड्या अनोळखी वाटणाऱ्या करिअर क्षेत्रा बद्दल माहिती दिली मराठी माध्यमातून शिक्षण घेवूनही मला या क्षेत्रात फारशी अडचण आली नसल्याचे सांगितले मात्र इंग्रजी भाषा येणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले, तिच्या कामाचे स्वरूप तिने उपस्थितांना समजून सांगितले व कुटुंबाच्या पाठबळामुळे शाळेतील संस्कारांमुळे मी यशस्वी ठरल्याचे सांगितले. या करिअर क्षेत्रात असलेल्या संधी तिने सांगितल्या .या दोन्ही मुलाखती विद्यालयाच्या शिक्षिका सौ. गायत्री आंबेकर यांनी घेतल्या, त्यांनी अनेक प्रश्न विचारून त्यांच्या करिअर क्षेत्राचा व आयुष्यातील यशस्वीतेचा जीवनपट उलगडला. याकार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी शिक्षक, विविध दैनिकांचे पत्रकार, नांदगाव मधील विविध शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी ,कार्यकारी मंडळ सदस्य जयंत मोंढे ,संस्थेचे सदस्य श्रीकृष्ण रत्नपारखी, संस्थेच्या करिअर फेअर प्रमुख सौ.कराळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी संकुल प्रमुख शशिकांत आंबेकर ,शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, संकुलातील शाळेंचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, श्रीमती लता अंडे, गोरख बागुल, राजाभाऊ अहिरे, टी. एम. बोर्ड अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण, करिअर फेअर प्रमुख जयंत निकम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापू गोविंद यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

मुंबई पावसात तुंबली: स्मार्ट महाराष्ट्र अपडेटस…

Next Article

प्रा. सुरेश नारायणे यांना अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्यीक पुरस्कार प्रदान

You may also like