नांदगाव पंचायत समितीद्वारे स्वच्छ भारत अभियानातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

Author: Share:
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव तालुका पंचायत समिती व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरिय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आले होते त्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात रोख रक्कम देवुन बक्षीस वितरण करण्यात आले स्थानिक व्यवस्थापन कमिटी सदस्य अनंत आहेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल ,संयोजक प्रा.आर.एल.दिवटे,पं.स.चे गटविकास अधिकारी जे.टी.सुर्यवंशी व  पाटणकर प्रा.एस एम. नारायणे,प्रा.ए.व्ही.कवडे,प्रा.सी.डी.काटे प्रा.श्रीमती जी.जे.सावळे यांच्या हस्ते बक्षीस दिले ही स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ या दोन गटात घेण्यात आली यावेळी वरिष्ठ गटातुन प्रथम क्रमांक नि ता नारायण उगले  (  नांदगाव महाविद्यालय) पाच हजार रूपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय विजेता बळीराम बोरसे तीन हजार व प्रमाणपत्र ( नांदगाव महाविद्यालय) तृतिय कोमल बाळु सोनवणे दोन हजार (नांदगाव महाविद्यालय) कनिष्ठ गटात प्रथम स्नेहल संजय पवार पाच हजार ( माध्यमिक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज,वडाली बु!) द्वितीय प्रियंका संजय कापडणीस ( नांदगाव महाविद्यालय) तिन हजार रूपये व तृतिय विभागुन श्रध्दा सुधाकर आहेर ( नांदगाव महाविद्यालय) भाग्यश्री आबासाहेब राऊत ( जनता विद्यालयात व ज्यु .कॉलेज, जातेगाव) यांना विभागुन प्रत्येकी एक हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात आले यशस्वी स्पर्धकांचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.
Previous Article

चित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर

Next Article

३० मार्च 

You may also like