Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नंदन निलकेणी देणार इन्फोसिस ला ‘आधार’ ?

Author: Share:
इन्फोसिस ह्या भारतातील प्रतिष्टीत आयटी कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक नंदन निलकेणी ह्यांना रिक्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारयाच्या पदावर परत बोलावण्याचा विचार होत असल्याचे वृत्त आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मागणी केल्यावर निलकेणी यांना परत बोलावण्याचा विचार संचालक मंडळ करत असल्याचे समजते. नंदन निलकेणी हे भारत सरकारच्या आधार अर्थात युआयडी योजनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे, करोडो भारतीयांना आधार देणाऱ्या निलकेणी यांच्याकडेच इन्फोसिस आधारासाठी आशेने पाहत आहे.
इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. नारायण मूर्तींकडून मानसिक छळ (assault) होत असल्याच्या कारणावरून त्यांनी राजीनामा देत असल्याचे मुंबई शेअर बाजाराला कळवले होते. इन्फोसिस चा समभाग तब्ब्ल १०% घसरला होता.
निलकेणी यांना कुठले पद द्यावे याचा निर्णय येत्या ४८ तासात होण्याची शक्यता आहे.
आज इन्फोसिस चा समभाग २% वाढून ८९४ वर बंद झाला.
Previous Article

जल्ला यवरा टाईम का लागला?

Next Article

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिला राजीनामा: मोदींनी सांगितले थांबायला

You may also like