Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नरसिंह चिंतामण केळकर

Author: Share:

जन्म २४ ऑगस्ट १८७२ – स्मृतिदिन १४ ऑक्टोबर १९४७

न. चिं. केळकरऊर्फ तात्यासाहेब केळकर हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.

तात्यासाहेबांचे घराणे रत्‍नागिरीजवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार,मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.

मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळक यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात्त आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य भागातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले. केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. लंडनमध्ये भरलेल्या दुसर्‍या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.

Previous Article

२४ ऑगस्ट

Next Article

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर

You may also like