माझी माय मराठी

Author: Share:

|| जन्म मला दिला ज्यांनी ते माझे मायबाप मराठी ||
|| हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय मराठी ||
|| १३व्या शतकात लिहिली आहे ज्ञानेश्वरीे मराठी ||
|| श्रीमनाचे श्लोक सांगणारे समर्थ रामदास मराठी ||
|| तुकाराम-ज्ञानदेव-मुक्ता-जनाबाईंचे अभंग मराठी ||
|| या संताच्या पुण्यभूमीत राहतात लोकं ती मराठी ||

|| स्वच्छ-शुद्ध-उच्चार तिचे, बोलण्यास गोड मराठी ||
|| अ आईपासूनी-ज्ञ ज्ञानेश्वरापर्यंत आहे माय मराठी ||
|| सुरेश भटांची एक कविता जगात प्रसिद्ध मराठी ||
|| ऐकुनीया धन्य व्हावे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ||
|| भक्तिसंपन्न अशा महाराष्टाची राज्यभाषा आहे मराठी ||
|| सहयाद्रीच्या दरी-खोऱ्यातुन आवाज गुंजतो मी मराठी ||

|| स्वराज्याचे आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके मराठी ||
|| सावरकर-चाफेकर बंधू-टिळक-गोखले-आगरकर मराठे ||
|| स्वातंत्र्याच्या लढ्यात पहिले उतरलेे ते वीर मराठी ||
|| शिक्षणाचा हक्क महिलांना मिळवून दिला ज्यांनी, ||
|| त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होते मराठी ||
|| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर मराठी ||

|| चित्रपटसृष्टीचे भारतात पाहिले पाऊल पडलेे मराठी ||
|| ‘राजा हरिशचंद्र’ हा पहिला चलचित्र आणला ज्यांनी, ||
|| ते आमुचे थोर दादासाहेब फाळके होते हो मराठी ||
|| भारताची गानकोकिळा गायिका लता मंगेशकर मराठी ||
|| क्रिकेटचा देव जग म्हणती ज्याला तो सचिन तेंडुलकर मराठी ||
|| महाराष्ट्रातील कलावंतांचा सन्मान “झी गौरव” मराठी ||

|| महाराष्ट्राच्या या मातीत थोर मराठी कवी जन्मले ||
|| एक त्यातील कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज येऊनिया गेले ||
|| सातासमुद्रापार नेली त्यांनी आपुली मायबोली मराठी ||
|| जागतिक भाषांच्या यादीत पंधराव्या स्थानी उभी मराठी ||
|| म्हणुनिया २७ फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिना दिवशी ||
|| साजरा केला जातो ‘जागतिक भाषा दिन मराठी’ ||

कविता: रोहिदास गो. चौधरी
(दातिवरे)


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

सेन्सेक्स ३४००० पल्ल्याड, आज १६० अंशांची झेप. 

Next Article

नांदगाव येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती साजरी

You may also like