मुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन!

Author: Share:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपतीबाप्पाचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. श्रावण महिना आला कि उत्सवांची धामधूम सुरु होते, आणि त्याचा श्रीगणेशाच होतो गणेशोत्सवाने!  गणेशोत्सवाला अवघे ५ दिवस शिल्लक असताना, आज रविवारचा मुहूर्त साधून अनेक सार्वजनिक गणपतींचे आज जलशात आगमन झाले.  लेख लिहीपर्यंत या मिरवणुका चालू आहेत. 
उत्सव म्हटला कि मुंबई खुलते. सदा चमचमीत राहणारे हे शहर उत्सवाचं रोषणाईत अपूर्व उत्साहात न्हाऊन निघते. रस्त्यावर पोट्ट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, गणपतीच्या येणाऱ्या मिरवणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. गणपती बसतो तिथे राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात तर प्रचंड उत्साह, कारण यावेळचे बाप्पाचे स्वरूप कसे असेल हे आत्तापर्यंत मंडळाच्या पोरांनी लपवू ठेवल्याने त्याची उत्सुकता! त्यातून, मूर्ती फिक्स करून आलेल्या पोरांनी, एकदम भारी आहे, असे म्हणून उत्सुकता अजून टांगून ठेवलेली. मंडपाकडे येणारी स्वारी जशी जशी दिसते आहे, तसा सर्वांचा उत्साह अजून वाढतो आहे, कारण बाप्पाचे ते उंचच उंच रूप अजून मोहात पडते आहे.
रस्त्याच्या नाक्यावर घोळक्याने पोटी उभी आहेत, तरुण आहेत, जेवण करून आलेले लोक आहेत. हा इथला राजा.. टोबॅग इथला महाराजा म्हणत येणाऱ्या मूर्ती डोळ्यात साठवून ठेवतायत. पाऊस असल्याने बऱ्यापैकी मूर्ती झाकलेल्या आहेत. त्या प्लास्टिक मधून होणारे ते बारीकसे दर्शन तर जणू मूर्तीचे सौंदर्य अजून खुलवते आहे .
नाशिक आणि पुणेरी ढोलताशांचा गजर तर रस्ते दुमदुमवतो आहे. नकळत पाय थिरकावेत अशा लयीत ढोलावर काठ्या आदळत आहेत. डीजे पेक्षा ढोल ताश्यांकडे मंडळाने दिलेले लाक्षाजूं सुखावून जाते आहे. कुठे पारंपरिक बिट्स ऐकू येत आहेत कुठे झिंगाट..
सकाळपासून पाऊसही भन्नाट आहे. आता दोन तास कसा तो नेमका थांबला.. बाप्पाची मूर्ती कारखान्यातून काढून ट्रकवर नेऊन तयावर प्लास्टिक टाकेपर्यंत… आणि बापा नेमका मध्यावर  पाऊसाने एक सर टाकली.. बापाच्या मूर्तीवर अभिषेकच  केला जणू! मग काय नाचणाऱ्यांना अजूनच चेव आला.. पोरं खुश झाली! ढोलवरील थापा कमी झाल्या, पण नाचणारे पाय..
पाऊस थांबला.. आणि बाप्पा पुन्हा पुढे सरकले! मंडपात विराजमान होण्यासाठी!
Previous Article

पहिल्या वन-डेत भारत विजयी, धवनचे शानदार शतक

Next Article

लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, म्हणजे काय?

You may also like