येणाऱ्या ४८ तासात मुंबई- पुण्यात उष्ण लाटांचा अंदाज

Author: Share:

वाढत्या उकाड्यामुळे मुंबई, पुणे व नाशिककर हैराण झालेत. हा त्रास अजून वाढण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात मुंबई, पुणे व नाशकात दमट लाट पसरण्याची शक्यता आहे, अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. नाशिक व पुण्याचा पारा चार ते सहा अंशाने वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईत सहा ते आठ अंश पारा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या ईतर भागात गरमा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गरम्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. गेल्या काही दिवसात उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. कोकण, गोवा व मध्या महाराष्ट्रात तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा थोडे कमी आहे. मात्र येत्या दोन दिवसात उष्ण वारे वाहणार असल्याने तापमानात वाढ होणार आहे.

एकाबाजूला राज्यात तापमान वाढीची शक्यता असतानाच, महाबळेश्वर परिसरात पाऱ्यात घट झाली असून, पारा १० अंशापर्यंत खाली आला आहे.

Previous Article

२४ मार्च 

Next Article

खेकडा चार्जरचा स्फोट, तरुणाने तीन बोटं गमावली

You may also like