Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सुधारित मुंबई विकास आराखड्याची बांधकाम व्यवसायास चालना मिळण्याची शक्यता!

Author: Share:

सुधारित विकास आराखडा बांधकाम विकासासाठी पूरक असल्याची शक्यता असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबईच्या सुधारित विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीला सोमवारी रात्री महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यावर विकास नियंत्रण नियमावली लागू होईल.

नियमावलीमुळे विकासकामांना गती मिळण्याच्या तरतुदी आहेत. १२ मीटरवरील रस्त्यांना १ टीडीआर व १८ मीटरवरील रस्त्यांना १.५ टीडीआर लागू केले गेले आहेत तर मुंबई उपनगरात असलेला दोन एफएसआयचा निर्बंधही हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरात उंच इमारती बांधणे शक्य होईल. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील बांधकामांची संख्या येत्या काळात वाढेल असे चित्र आहे.

विकास आराखडा लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन विकासक व बांधकामदारांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी केलेली दिसते. यावर्षी जानेवारीपासून तब्ब्ल १८९७ इमारतींचे प्राथमिक मंजुरीसाठी प्रस्ताव महापालिकेकडे आले असून, ९५० इमारतींना मंजुरी मिळाल्याचे समजते. मागील एकूण १४१४ अर्ज आले होते आणि केवळ १९९ इमारतींना मंजुरी मिळाली, यावरून ही तफावत अधिक अधोरेखित होते. मंजुरी देण्याच्या कालावधीतही घट झालेली दिसत असून प्राथमिक मंजुरीचा कालावधी ३१ दिवसांवरून सहा दिवसांवर तर बांधकामाच्या मंजुरीचा कालावधी आठ दिवसांवरून साधारण तीन दिवसांवर आला आहे.

Previous Article

स्वामी विवेकानंद आणि त्यांची (आम्ही पूर्ण करावयाची) मोहिमेची योजना

Next Article

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना परदेशात राहूनच मतदान करता येण्याची सोय

You may also like