Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

२९ ऑगस्ट: मुंबई आणि पाऊस: माझा अनुभव: प्रवीण दाभोळकर

Author: Share:

काल दिवसभरात सर्वच मुंबईकर, पोलीस, कर्मचारी यांनी काल जे स्पिरिट दाखवलं त्याला तोड नाहीए. प्रत्येकजण पावसात अडकलेल्या माणसांना स्वताच्या घरी बोलवत होता, गणेश मंडळामध्ये राहण्याची व्यवस्था होत होती. मंदिर, गुरुद्वारा लोकांना राहण्यासाठी उघडली जात होती. अजून काय पाहिजे? कोण कोणत्या जाती-धर्माचा नव्हता ,सर्व मुंबईकर मुंबईकरांसाठी धावून आले होते.

यावेळी  आम्हालाही अशीच सेवेची एक संधी मिळाली.

साडे नऊला नीतीनचा फोन आला पावसामुळे परळ रेल्वे स्थानकात अडकलेल्या दोघांची जेवणाची व्यवस्था करायची होती. त्यांना फोन लावल्यावर कळाल साधारण २५ ते ३० माणस अपंगांच्या त्या डब्ब्यात आहेत. जे गेली ७-८ तास एकाच जागेवर बसून. काहीतरी हालचाल करण्याची गरज होती.

तेवढ्यात सुमितचा मेसेज देवासारखाच आला.. “आम्ही पंचगंगा गणेशोत्सव मंडळातर्फे पावसात अडकलेल्या नागरिकांना जेवण देतोय.” सुमितला परळची परिस्थिती सांगितली आणि एका डब्ब्यात दाल राईस घेऊन सुमित तयारही झाला.

परळ ब्रिज पासून परळ स्थानकाला पोहोचण्यासाठी कंबरेवर पाणी होत. कोणाला तरी अन्न मिळण्यासाठी आम्ही निमित्त होणार होतो हा आनंदच खूप होता. ट्रेन मधल्या त्या डब्ब्यात अपंग, आजारी माणसं, डायलिसिस रुग्ण होते. त्या म्हणण्याने आमचा जेवणाचा डब्बा खूप लहान होता. पण जे वयस्कर आहेत, खूप आजारी आहेत त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली. एका डिशचाच चमचा बनवून सुमितकडे प्लेट भरण्याच आणि माझ्याकडे पोहोचवण्याचं काम होत. थोडा थोडा राईस सर्वानी आंनदाने वाटून खाल्ला. पंकज समेळ दादाने या माणसांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

दरम्यान पराग चव्हाण दादा कडून काहीतरी मदत होईल हे माहीत होतं. त्याच्याशीही आधी बोलणं झालं होतं. पराग दादाने सूत्र हलवली. आमचं जेवण वाढणं संपेपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय दादाने केली होती. त्याच्यासोबत लालबाग परळमधील कार्यकर्ते होते. कोण कोण होते ते दादालाच माहिती. अजूनही मदत पोहोचवण्यासाठी हे कार्यकर्ते सज्ज झाले. हे सर्व कार्यकर्तेही त्या पाण्याला ओलांडून आले होते. मदतीचे हात वाढलेले पाहून मी आणि सुमित दुसर्या कामासाठी तिथून निघालो. सर्व मस्त जमून आलं.

सतत धावणाऱ्या मुंबईच पाऊसही काही वाकड करू शकत नाही हे या वेळात सर्वच मुंबईकरांनी दाखवून दिलं होतं. गणेशोत्सव सुरू होण्यामगचा हेतूही खर्या अर्थाने सार्थ होत होता.

   –  प्रवीण दाभोळकर

Previous Article

२९ ऑगस्ट: आसनगाव ‘दुरांतो’ अपघात: डॉ विनय देवलाळकरांच्या अनुभवातून

Next Article

सेलिब्रेट करा मुंबईचे स्पिरिट…मुंबईचे गौरवगीत

You may also like