मला भावलेल मुंब्ईच रुप – स्मिता माळवदे.

Author: Share:

मुंब्ई! आपली मुंब्ई! माझी मुंब्ई! मला भावलेली मुंब्ई! महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली आपल्या सार्यांच्या ह्रदयाची धडकन मुंब्ई.
मुंब्ई म्हण्टल की डोळ्यासमोर येत ते मुंब्ईच घाईगडबडीच धावपळीच जीवन. रेल्वेची गर्दी, गाड्यांचे हाँर्न, डबेवाल्यांची धावपळ, जीव ट्रेनला लटकवून पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरीला जाणारे चेहरे. मुंब्ई म्हण्टल.की सिनेविश्वाला विसरताच येणार नाही. अशी ही धावणारी मुंब्ई जात, धर्म,. पंथ, प्रादेशिकता हा भेद न करता सार्यांना आपले करते.

आई जशी आपल्या बाळाला प्रेमाने कुशीत घेऊन जोजवते तशी मुंब्ई सार्यांना आपल्यात सामावुन घेते. अशी ही धावणारी मुंब्ई कधीतरी थांबते, रेंगाळते,भांबावते, दोलायमान स्थिती तिचीही होते. पण पुन्हा नव्या जोमाने ती पुर्ववत होते. कितीही संकटे आली तरी न घाबरता न डगमगता स्वतःला व आपले असणार्या सार्यांनाच सावरणारी मुंब्ई माझ्या मनाला ऊभारी देते.सकारात्मकतेने हि स्वप्न नगरी माझे मन भारावून जाते.आणि म्हणूनच माझ्या मनास भावते.

एकोणीसशे त्र्याण्णव सालीमुंब्ईत झालेले बाँब धमाके, तेरा जुलै दोन हजार सहाचे आणि सव्विस जुलै दोन हजार आठ रोजीच्या अतिरेकी हल्ल्याने मुंब्ईच नव्हे तर आख्खा भारत हादरुन गेला. आजपर्यंत मुंब्ईत झालेल्या अतिरेकी कारवायांपैकी ही सर्वात मोठी कारवाई होती. दहा अतिरेक्यांनी मुंब्ईला रक्तबंबाळ केले.साठ तासांच्या अथक परिश्रमानंतर मुंब्ई उध्वस्त करण्याचा अतिरेक्यांचा डाव उलथवून टाकण्यात मुंब्ई पोलिसांना यश आले. हाँटेल ताज पासुन हाँटेल ड्रायडेंट पर्यंत आणि नरीमन हाऊस पासुन मुंब्ईच्या रस्त्यापर्यंत फक्त बंदुकीच्या गोळ्या आणि रक्त यांचाच सडा पडला होता.त्यात साळगावकरांसारखे काही हिरे मुंब्ईला गमवावे लागले, पण त्यावेळी मुंब्ईकरांनी दाखवलेल धैर्य वाखाणण्याजोग आहे. कामा हाँस्पिटलच्या कर्मचार्यांनी दाखविलेली हुषारी मनास भावली.

याबाबत मुंब्ई पोलिसांनी दाखवलेल्या देशभक्तिच, शौर्याच.कराव तेवढ कौतुक कमीच आहे.सलाम केवळ माझाच.नव्हे तर सार्या भारताचा मुंब्ई पोलिसांना. ह्रदयद्रावक मन हेलावुन टाकणारी घटना खुप काही शिकवणारी अन शिकणारी मुंब्ई आणि कर्तव्यदक्ष मुंब्ई पोलिस माझ्या मनास भावले.

….पराक्रम आणि शौर्य यांची मिसाल
अतिरेक्यांचे स्वप्न केलेज्यांनी उध्वस्त
ते म्हणजे फक्त आणि फक्त मुंब्ई पोलिस….

बहादुर, सतर्क मुंब्ई पोलिसांप्रमाणेच या हल्ल्यानंतर मुंब्ईने जे स्वतःला सावरले ते मुंब्ईचे रुप माझ्यासाठी वंदनिय आहे म्हणूनच मला ते भावले.

सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंब्ई जलमय झाली होती त्यावेळीही मुंब्ईकरांनी एकी दाखवून निसर्गाच्या कोपाचा सामना केला होता.
आजही निसर्ग आपले रौद्र रुप दाखवत आहे. अंधेरीचा पुल पडला आहे. आजही मुंब्ईकर एकमेकांस सावरत आहे. पुन्हा नव्या जोमाने मुंब्ई उभी आहे. हेच मुंब्ईच खास वैशिष्ट्य आहे. हे मुंब्ईच रुप प्रत्येक संकटानंतर दिसून येत म्हणूनच मला ते भावत.

जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, आपला-परका सारे भेद विसरुन सर्व मुंब्ईकर एक होऊन आलेल्या संकटाला सामोरे गेले. ” एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ ” हे खर्या अर्थाने संकटात सापडलेल्या मुंब्ईकराने दाखवुन दिले.

मुंब्ईचा चाकरमानी चाळकरीही मला तितकाच भावतो. अगदी पाण्याच्या लाईनीत कचाकचा भांडणारी एकमेकांना शिव्या घालणारी मंडळी संकट येताच मात्र काहीही मनात अढी न ठेवता एकमेकांसाठी धावून जातात. हे मुंंब्ईच चाळकरी रुपही माझ्या मनास भावल.

मुंब्ईची लाईफलाईन असलेली रेल्वे तर मुंब्ईतील नोकरदार स्त्रियांचे माहेरच जणू. त्यांचा जणू आनंदोत्सवच अगदी डोहाळ जेवण, हळदीकुंकु हे रेल्वेत साजरे करुन महिलांनी.एकमेकींशी साधलेली एक रुपताच. तसेच रेल्वेत आपले समजुन अचानक उद्भवलेल्या बाळंतपणासारख्या प्रसंगाला तोंड देणार्या मुंब्ईच्या महिलांनी मुंब्ईला ज्या उच्च स्तरावर पोहचवले तेही माझ्या मनास मुंब्ईचे रुप भावले.

मुंब्ई मराठी माणसाची आहे असे ठासून निर्भिडपणे सांगणारे मुंब्ईच्या सामाजिक चळवळीतून उदयास आलेल एक वादळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय. त्यांचे कर्तुत्व, नेत्रुत्व आजही प्रत्येक मुंब्ईकराच्या नव्हे नव्हे महाराष्ट्राच्या ह्रदयावर अधिराज्य केले. करत आहेत आणि पुढेही करतील. सामाजिक कार्य करता करता मुंब्ईला अधोरेखांकित करण्याच कार्य याच मुंब्ईकराने केले. बाळासाहेबांच्या कार्यकर्तुत्वाच मुंब्ईच रुप माझ्या मनास भावल कारण मुंब्ईच्या सामाजिक आणि राजकिय कार्याचा तो सुवर्णकाळ होता.

आज संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या,ज्यांच्या रणनितीचा अभ्यास जग करत आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक बाळासाहेबांच्या प्रेरणेतुन मुंब्ईच्या समुद्रात साकार होणार आहे हे मुंब्ईच्या अभिमानाचे प्रतिक असेल म्हणूनच ते माझ्या मनास मुंब्ईचे भावी रुप भावते.

मुंब्ईच आणखी एक भावलेल रुप म्हणजे टाटा मेमोरियल हाँस्पिटल जवळ संत गाडगे महाराज धर्मशाळा कँन्सरपिडीतांना टाटा हाँस्पिटल कडून पत्र मिळाले की पाचशे रुपये डिपाँझिट घेऊन मोफत रहायला देतात. धर्मशाळा सोडली की पाचशे रुपयेही परत मिळतात. या दरम्यान मेहुल दोशी हे व्यापारी आणि समाजसेवक पेशंटला आणि त्याच्या घरच्यांना मोफत जेवण देतात. हे मुंब्ईचे रुप मनास भावले.

याच मुंब्ईने अनेक कलाकारांना-खेळाडूंना मोठे केले. उत्तर प्रदेशचा अमिताभ बच्चन असो कि मध्यम वर्गिय कुटुंबातला सचिन तेंडुलकर असो. अमिर, शाहरुख, सलमान, लता मंगेशकर, माधुरी दिक्षीत, सुनिल गावस्कर सार्यांनाच मुंब्ईने भेद न करता मोठ केल. जगात किर्ती मिळवून दिली.

सिनेस्रुष्टीबरोबरच मराठी नाटकांना, नाट्य कलाकारांना नवजीवन देणारी हिच मुंबँई. मराठी भाषा आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवून ठेवणारी हिच मुंब्ई आहे. आणि हे मुंब्ईच रुप माझ्या मनास खुपच भावत.

मुंब्ईचा डबेवाला, गिरणी कामगारही मला तितकाच जवळचा वाटतो. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणजे मुंब्ई महाराष्ट्राची शान. शिक्षण, तंत्रज्ञान, फँशन, सुधारकता प्रत्येक गोष्टित मुंब्ई अग्रेसर आहे.महिलांची सुरक्षितता म्हणाल तरदेशाची राजधानी दिल्ली सारख्या मोठ्या शहराच्या मानाने नक्किच अधिक आहे. हेच स्त्रि दाक्षिण्याच रुप माझ्या मनास मोहात पाडत आणि माझ्या मनास भावत.

मुंब्ई केवळ दुखःद प्रसंगी, संकटकाळीच एकत्र येते अस नाही तर कोणत्याही धर्माचे कोणत्याही प्रांताचे सण उत्सव पाहिले तर मुंब्ईत आनंदोत्सव तितक्याच एकरुपतेने प्रेमाने साजरे केले जातात.

मुंब्ईच हे संविधानात बाबासाहेबांनी नमुद केलेले अनेकतेतुन एकता हे संस्कार अन संस्क्रुतीच रुप हे मलाच काय प्रत्येक वाचकाच्या ह्रदयाचा ठाव घेणार मनमोहक रुप सार्यांच्याच मनास भावत असणार याबद्दल मला पुर्ण खात्री आहे.

महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, राजकिय आणि सांस्क्रुतिक द्रुष्ट्या सम्रुद्ध आणि संपन्न करणारी मुंब्ईच तर आहे. मुंब्ईच हेच रुप मला भावत.
दिलसे सलाम आणि मानाचा मुजरा मुंब्ईला. माझ्या मनास भावलेल्या मुंब्ईला.

श्रीमती स्मिता सुधिर माळवदे.
मो.नं. ९२७०२१७३०१.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

मला भावलेलं मुंबईचं रुप – मल्हार मोरे

Next Article

मला भावलेलं मुंबईच रूप – नार्वेकर सर

You may also like