मला भावलेलं मुंबईच रूप – नार्वेकर सर

Author: Share:

आज मी गेली तीस वर्ष मालाड या उपनगरात रहातो. माझं बालपणं मुंबईच्या फोर्ट विभागात गेलं. माझी शाळा मनोहरदास मुन्सिपल शाळा. जी पी ओ  च्या समोरची.  इयत्ता सातवी पर्यंत मुन्सिपल शाळॆत होतो. आज मागे वळून बघताना माझ्या  मुन्सिपल शाळेचा मला अभिमान वाटतो… शाळेत मिळणारे दूध, बिस्किटे, शेंगदाणे. खूप गोड लागायचे.  आज खिशात पैसे आहेत… हव्या त्या हॉटेलात जाऊन दूध पिऊ शकतो. किशे  भरून शेंगदाणे खाऊ शकतो पण वर्गातल्या त्या क्रमाने मिळण्याऱ्या शेंदण्याच्या पुडीची मजा काही वेगळीच होती.

      माझी नगरपालिकेची शाळा पण आजच्या इंग्रजी मोठ्या शाळेपेक्षा खूप शिस्तीची व मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणारी होती. त्या शाळेत तेव्हा दाखवलेले सिनेमे आजही माझ्या मनात जिवंत आहेत. फ्रेम बाय फ्रेम.  झाशीची राणी, रामशास्त्री, शिवाजी महाराज, एकलव्य हे सिनेमे मला माझ्या शाळेतून दाखवले होते. आजच्या मुलांना दाखवतात का असे संस्कारक्षम सिनेमे?  जे काही टी  व्ही वर दिसते त्यातून ते संस्कार काय घेतात… असो… आज इतक्या  वर्षानंतर मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो… म्हणून मुंबईचा वाटतो.

माझे बाबा मेडिकल असोसिएशनच्या ऑफिसात कमला होते. त्याची काही पोस्टात काम असायची. तेव्हा ते मला पोस्टात घेऊन जायचे… म्हणजे आताच्या जी. पो. ओ. माझ्या घराकडून जवळ होते… मधल्या गोल चौथऱ्याभोवती फिरायचो. … रजिस्टर ए डी, मनीऑर्डर, पार्सल, तिकीट, मला फक्त बोर्डाचा वाचायला यायचे. खिडकितला माणूस दिसत नसे… कारण त्या खिडक्या उंच होत्या… बाबा मला रजिस्टर ए डी करायला सांगायचे…. पत्ता कुठे लिहायचे… वगैरे ते झाले  कि आतला माणूस खाली वाकून माझंही पाकीट घ्यायांचा….. आज आठवलं तरी खूप बार वाटत.

               बाजारगेट स्ट्रीट ला राहत होतो म्हणून मला सेंट्रल लायब्ररी जवळ होती. त्या लायब्ररीच्या पायरीनवर किती वेळा एकटा बसलो असेंन कुणास ठाऊक. आठवीत असताना मी पेपरची लाईन टाकायचो… माझी दुपारची लाईन होती… दोपहर समाचार… मिड-डे … गुजराती पेपर असायचा… माझंही भाग्य माC शेवटचा पेपर सेंट्रल लायब्ररीत होता… त्या निमित्ताने मला हक्काने लायब्ररीत अगदी आत जात येत होते. पेपर दिला कि मग मी थोडा वेळ रंगळायचो… केवढा मोठा हॉल होता  तो… मोठं मोठ्या टेबल वर बसून मोठी माणसे मोठी मोठी पुस्तक वाचत बसलेली असायची… त्यांना बघून मलाही वाटायचे कि आपणही मोठे झालो कि असेच ह्या मोठ्या टेबलवर बसून वाचन करायचे… मी एस. एस. सी. ला गेल्यावर  त्या मोठं मोठ्या खांबाआड बसून कितीवेळा अभ्यास करायचो आठवत नाही… आम्ही मित्र मिळून रात्री पण त्या दिव्या खाली अभ्यास करायला जायचो… खोटं नाही सांगत पण रात्री अभ्यास व्हायचा नाही … मस्तीच करायचो… खोटं खोटं पुस्तक वाचायचा अभिनय करायचा …. मग बाबा यायचे बोलवायला… तेव्हा जायचो… घरी …

बाबांचा हात धरून गेटवेला फिरायला जायचो तेव्हा गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ राणीचा मोठा पुतळा होता… त्या पुतळ्याच्या जवळ खेळणारी मुल्क्स होती व सिव्ह, वाघ त्या पुतळ्यात होते… असं  खूप मोठं म्युरल गेटवेजवळ होत…  काळाच्या ओघात ते कुठे गेल्क्स ठेवूकी नाही. पण ते  म्युरलवरचे वाघ आजून आठवतात. मी  त्याच्यावर  बसायचो. गेटवेच्या मधल्या घुमटात जाऊन ओरडायचो तेव्हा आवाज घुमायला. खूप मजा यायची. पिसे नसायचे मग बाबा पेरीवाल्याकडून चणे शेंगदाणे घ्यायचे. ते दहा पैशाचे चणे शेंगदाणे मन भरून पुरायचे.  लहान असून सुद्धा बिनधास्त वावरायचो…. आणि आता मोठे झालोत पण बिनधास्त वावरायची भीती वाटते. आता इतकी गर्दी वाढली कि आता गेटवेवर बसायलाच जागा नसते. तेव्हाची मुंबई अजून मनात टवटवीत आहे.

      आज बाबा नाहीत… त्यांना जाऊन खूप वर्ष  झाली… बाबांच्या आठवणी जश्या मनात टवटवीत आहेत तश्या बाबानी दाखवलेल्या खऱ्या मुंबईच्या आठवणी पण ताज्या आहेत. सुंदर आहे. सजीव आहेत.

    @नार्वेकर सर, ९३२२२ १४८२५


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

मला भावलेल मुंब्ईच रुप – स्मिता माळवदे.

Next Article

मला भावलेले मुंबईचं रूप – डॉ सुरेंद्र विनायक पिसाळ

You may also like