मला मुंबईचं भावलेलं रुप – शुचि बोरकर

Author: Share:

मायानगरि मुंबई

ईश्वर सत्य हैं… सत्यहि शिवहै जागो.. अशी सुंदर तान (लताबाईचि )कानि पडते आणि ईश्वराच्या शाश्वत सत्यतेच दर्शन घडवून देत.श्री ४२० राजकपूर कधि म्हणतात किसिकि मुस्कराहटो पे हो निसार… तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून म्हणतात मेरा जुता है जपानी ये पतलुन एंग्लिस्तानि सर पे……फिर भि दिल है हिंदुस्तानी” असे म्हणत भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या काळात नेण्यात यशस्वी

चित्रपट नेहमी मनोरंजक उद्बोधक सामाजिक राजकीय वयक्तिक विषय हाताळनारे असतात . माणसाची अनेक अपुरी स्वप्ने रंगवुन
त्याला या मायानगरित ३ तास रमवुन स्वताच्या ताण दुखास विसर पाडणरे आणि निखळ आनंद देवून पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यास प्रेरणा
देतात. ये जीवन है इस जीवन का यहि है रंग रुप थोडे गम है थोडी खुशिया …. यहि है छाव धुप…

अशी हि मायानगरी मुंबई. हिची ओळख करून देणे म्हणजे सुर्याला दिवा दाखवण्यासारखेच. लख लख चंदेरी दुनियेत या प्रसिद्ध मायानगरिचि ख्याती आहे. जीवनातिल अनेक पैलू चे दर्शन घडवून प्रेम आदर्श मैत्री संस्कृती चारित्र्य माणुसकी देशप्रेम या गुणाचि केलेली पाठराखण हा सिनेमा चा आशय आणि आत्मा आहे . ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके ये है बोम्बे मेरी जान… .अशी ख्याती आहे मुम्बई च्या जीवनाची इथे मराठी हिंदी दोन्ही चित्रपट निर्मिती होते.  अनेक सामान्य माणसे स्वतः चे कला गुण सिध्द करण्याच स्वप्न घेऊन देश्याच्या विविध प्रांतामधून इथे येतात.काही महानायक अमिताभ बच्चन बनतात तर काही लता दीदी सारखे इवलेसे रोप लावियले दारि . म्हणत गगनभरारी घेत भारत रत्न.

गुणांची पारख करून त्याला कष्टाची जोड यशाचि पायरी चढत महालक्ष्मी प्रसन्न होते तर सिद्धिविनायक आशीर्वाद देतात सामान्य माणसाच एक ताऱ्यात किवा तारकेत रूपांतर करण्याच सामर्थ्य फक्त या मुंबईतच आहे. ….देवा दिलि हाक उद्धार कराया…. आभाळाचि छाया तुझी समिंदराचि माया… मोरया….

हि मायावी जादू अष्टपैलू आहे.

काबाडकष्ट कष्ट करण्यात…. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती.. असा मजुरास दिलासा देतात तर कधीअरे संसार संसार….. गृहिणी च महत्त्व पटवून देतात. तर लकडीकि काठी…. म्हणत लहान मुले टगबग करतात. किवां चंदा है तु.. मेरा सुरज है तु.. म्हणत मातृप्रेम दाखवतात .प्रेमाची… उदात्तता तुम गगनके चंद्रमा हो मै धरा कि धुल हु.. आणि लग्न प्रसंगी चि छेडछाद मेरे हाथो मे नो नो चूडियां है…

असे विविध जीवन रंग दर्शन इथे घडत. तर … राम तेरि गंगा मैली हो गयि… असे सामाजिक विषय किंवा तु हिदु बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान कि औलाद है इंसान बनेगा असे धार्मिक संतुलन करण. जीवनातिल नैराश्य .. एक अकेला इस शहेर मे रात मे और दोपहर मे आबूदाना धुंडता है… किवा.. जलादो इसे फुक दालो ये दुनिया मेरे सामने से हॉट दो ये दुनिया… तुम्हारी तुम हि सम्हालो ये दुनिया असे म्हणत जीवनातुन खरच एक्झिट घेत गुरुदत्त नियतीला सामोरे जातात.

चेंबर या चित्रनिर्मिती चे माहेरघर. आर के स्टुडिओ इथे दिमाखात उभा.. विविध ठिकाणी प्रभात राजकमल नवकेतन फिल्मिस्तान
असे अनेक नामांकित स्टुडिओ आपल अस्तित्व सिद्ध करतात कांदिवली ला हि अनेक सेट तर ताडदेव ला अनेक कार्यालये आहेत.एकूण उद्योगाचे घरि रिध्हि सिद्धि पाणी भरि. म्हणूनच नाव पैसा प्रसिद्धी यश हि या चित्रनगरीचि ओळख….ति सांगते हर घडी बदल रहि है रुप जिंदगी…. हर पल यहा जी भर जियो…

या नगरीत अनेक प्रसिद्ध तारे तारका दिग्दर्शक निर्माते मुख्यत्वे जुहू भागात वास्तव्य करतात.
यांचे यश अपयश चढाव उतार सुख दुख या सर्वांची साक्ष देत काळ आम्हास जाणीव करून देतो कि … जिदगि एक सर्कस है शो तिन घंटेका . पहिला घंटा बचपन है दुसरा जवानी तिसरा बुधापा है…जीना यहा मरना यहा… इसके सिवा जाना कहा.. ..

@शुचि बोरकर

नवी दिल्ली


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

*निलेश राणे यांना “दिल जोडे भारत जोडे” प्रेरणास्रोत युवा पुरस्काराने सन्मान*

Next Article

मला भावलेल मुंबईचं रूप – वैभव पाटील

You may also like