मला भावलेलं मुंबईचं रुप – निलेश बामणे

Author: Share:

मुंबईचे मला आवडलेले रूप…वेग

मी लहानाचा मोठा मुंबईत झालो, मी मुंबईची भव्यता, दिव्यता डोळेभरून पहिली आहे पण मला व्यक्तीश: भावतो तो मुंबईचा वेग साऱ्या जगात मुंबईबाबत असे म्हटले जाते की मुंबई कधीच कोणासाठी थांबत नाही अगदी कोण्या राजकीय पक्षाने मुंबई बंद पुकारुन तो यशस्वी झाल्या नंतरही ! कारण त्या बंदमूळे मुंबईचा वेग कमी झालेला नसतो कारण त्या बंदच्या दिवशी मुंबईतील लोक आपल्या घरातील कामे करतात, मित्रांशी गप्पा मारतात खेळतात नाहीतर आवडीचे चित्रपट पाहतात पुस्तक वाचतात तर काही सुखाची झोप घेतात अर्थात त्या दिवशी इतर वेळी करणे शक्य न झालेल्या गोष्टींना वेग आलेला असतो. मुंबई हे भारतातील एकमेव शहर असावे जे कधीही झोपी जात नाही मध्यरात्री नंतर काही तास फक्त शांत असते पण बंद नसते कारण त्यावेळीही मुंबईतील हजारो कारखाने सुरु असतात त्यात लाखो कामगार काम करीत असतात ते सोडा रात्रीचे पहारेकरी जनतेचे मित्र पोलीस जागेच असतात मुंबईचा वेग कधीच कमी होत नाही यात या पोलीस बंधूंचे अधिक योगदान आहे. म्हणूनच जगात मुंबई पोलिसांचे नाव आदराने घेतले जाते.

मुंबई आपला वेग गरीब श्रीमंत कोणासाठीही कमी करत नाही मुंबईतील प्रत्येक माणूस घड्यालावर चालत असतो त्याच्याकडे निवांत असा वेळ नसतोच तो त्याला काढावा लागतो इतर लोकांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडलेला असतो पण मुंबईतील माणूस वेळ कसा काढावा याच्या शोधात असतो. कित्येकांना तर तो वेळ मिळतच नाही. मुंबई बाहेरून मुंबईत आलेल्या प्रत्येकाच्या जगण्याला नकळत वेग येतोच, मुंबई बाहेरून आलेला प्रत्येक माणूस त्या वेगाच्या प्रेमात पडतो आणि मुंबईचाच होऊन राहतो.

मुंबईतील रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावरही मुंबई एका दिवसात सावरली आणि सुरळीत झाली तिच्या वेगावर या घटनेचा अजिबात परिणाम झाला नाही. मुंबईत राहणाऱ्या माणसांना त्यांच्या आयुष्यातील कित्येक वर्षे कसे भुर्रकन उडून जातात ते कळतही नाही. मुंबईतील माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर जातो तेव्हा त्याला मुंबईचा वेग प्रकर्षाने जाणवतो. मुंबईतील प्रत्येक माणसाच्या वेळेची एक किंमत ठरलेली आहे मग तो करोडपती असो वा भिकारी ! येथे भिकाऱ्यालाही माहीत असते की आपण मुंबईतील कोणत्या भागात किती वेळ भिक मागितल्यावर आपल्याला किती भिक मिळेल !
मुंबईच्या वेगाची जशी एक चांगली बाजू आहे तशीच एक वाईट बाजू आहे येथे जगण्याला इतका वेग आहे की प्रत्येकजण स्वतःसाठी वेळ काढायला धडपडत असताना तो इतरांसाठी, नातेवाईकांसाठी वेळ कसा काढणार अगदी रक्ताची मातीही येथे कधी कधी धाब्यावर बसवावी लागतात. म्हणूनच इतर वेळी हे शहर भावनाशून्य असत पण जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट येत तेंव्हा मात्र हे शहर दयेच्या महासागराच रूप धारण करत हे साऱ्या जगणे पाहिलेले आहे. मुंबईचा वेगात जरा जरी खंड पडला तरी त्याची दाखल संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात घेतली जाते इतकं महत्व आहे मुंबईच्या वेगाला. दिल्ली जरी देशच हृदय मानलं तर मुंबई देशाचा श्वास मानायला हवा ! मुंबईचा वेग जारातरी मंदावला तरी कित्येकांच करोडो रुपयांचं नुकसान होत.

उगाच नाही म्हणत मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मुंबई काही वर्षे राहिलेला माणूस मुंबई सोडून फक्त परदेशात राहण्याचा नाहीतर नाईलाजाचा पर्याय निवडतो. मुंबई तस म्हणायला गेलं तर देशातील एक छोटसं शहर पण या शहरात राहतात दीड करोड लोक या शहरात राहतात इतक्या लोकांना सामावून घेण्याची खरंतर मुंबईची क्षमताच नाही पण मूलभूत गरजांचा तुटवडा असताना लोक येथे खुराड्यात राहिल्या सारखे राहतात त्याला एकच कारण आहे वेग फक्त वेग !  हा वेग फक्त जगण्यातील नाही तर परिस्थितितलाही आहे मुंबई बाहेरून मुंबईत येणारा प्रत्येक माणूस उराशी एक स्वप्न बाळगुणच येतो मुंबईत आल्यावर त्याच्या स्वप्नांना एकतर वेग येतो नाहीतर त्याची स्वप्ने क्षणात धुळीला मिळतात. अवघ्या काही वर्षात येथे भिकारीही श्रीमंत होतो आणि कधी कधी श्रीमंताचाही भिकारी होतो. परिस्थिती कोणाचीही बदलण्याचा मुंबईचा वेग फारच जास्त आहे.

मुंबईत रोज अपघातात हजारो माणसे मरतात तेव्हा हळहळ व्यक्त होते पण तेवढ्यापुरतीच प्रत्येकजण घरी जाईपर्यत तो पहिलेला अपघात विसरलेला असतो. येथे गुन्हे जितक्या वेगाने घडतात तितक्याच वेगाने गुन्हेगार पकडलेही जातात. मुंबईत सर्वच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही फार वेगात उरकली जातात. म्हणूनच म्हणतात मुंबईत राहिलेला माणूस जगात कोठेही राहू शकतो. मुंबत सध्या जितक्या वेगाने टॉलेजंगी इमारती उभ्या राहता आहेत ते पाहता येणाऱ्या काही वर्षात मुंबई नक्कीच झोपडी मुक्त असेल मुंबईच्या प्रगतीचा वेग जगभरातील प्रगत शहारांपेक्षा किंचितही कमी नाही हे मान्य करावंच लागेल.

मुंबईचा वेग ही मुंबईची ओळख आहे उद्या मुंबई शहर रात्र – दिवस सुरु राहील तेव्हा या वेगात आणखी भर पडलेली असेल पण त्या वेगात मुंबईकर हरविणार नाही याची काळजी घ्यायला हवी…वेग म्हटला की त्या वेगाने बऱ्याच गोष्टी हातातून   सटकतात त्यामुळे मुंबईतील अस्वच्छतेकडे, वाढत्या अपघाताकडे, वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे…कारण कधी –  कधी वेग मंद व्हायला एक खडाही पुरेसा होतो त्यामुळे वेगवान जीवन जगत असतानाही मुंबईकरांना आपले डोळे सताड उघडे ठेवावे लागतात…वेगावरही लक्ष ठेवावं लागत…कारण येथे एक दुळकीही कित्येकांच्या प्राणावर बेतू शकते त्यामुळे मुंबईचा वेग जरी हृदयाला भिडणारा असला तरी कधी –  कधी तो हृदय हेलावणारही असतो पण तरीही प्रत्येक मुंबईकर शेवटच्या श्वासापर्यत या वेगाच्या प्रेमात असतो…

लेखक – निलेश बामणे
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगाव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
मो. ८१६९२८२०५८ / ८६९२९२३३१०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

मला भावलेल मुंबईचं रूप – वैभव पाटील

Next Article

मला भावलेलं मुंबईचं रूप – निळकंठ शां. तांबे

You may also like