Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मेसेंजर ऑफ गॉड निघाला मेसेंजर ऑफ इव्हील; अनुयायांची गुंडगिरी.

Author: Share:

चंदीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. राम रहीमवर त्याच्या आश्रमातील दोन साध्वींवर १५ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

बाबा राम रहीमला आज रात्रभर सैन्याच्या कस्टडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या अंबाला जेलमध्ये त्याला हलवले जाईल. २८ ऑगस्टला अंबाला जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षेची सुनावणी होऊ शकते.

२००२ साली डेरा सच्चा सौदामधल्या एका साध्वीनं तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी कथन केली होती. एका निनावी पत्रामध्ये गुरमित राम रहीम यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.

गुरमीतच्या समर्थनार्थ त्याच्या अनुयायांनी गुंदगिरी सुरु केली आहे. अनुयायांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. माध्यमांच्या गाड्या जाळण्यात आल्या, पोलिसांवर दगडफेक करण्यात आले, तसेच संगरुरजवळ गेंदगाव येथील वीज कार्यालय पेटवल्याची घटना समोर आली आहे.

Previous Article

जैन मुनींनी संजय राऊतांना झापले; तुझ्या आईने तुला संस्कार दिले नाहीत.

Next Article

गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग १

You may also like