कोणता बिजनेस होईल हिट २०१८ मध्ये!

Author: Share:

नीती आयोगाचे सीईओ अरविंद पानगरिया यांनी भारतात सर्वाधिक डेटा (इंटरनेट सर्फिंग, डाउनलोड अन अपलोड) वापरला जात असल्याचे सांगितले. सध्या असलेले ४जी नेटवर्क आणि त्यामुळे फास्ट झालेले इंटरनेट, जिओ ने कमीत कमी पैशांमध्ये अधिकाधिक डेटा देऊन तोडलेले मार्केट, आणि इतर कंपन्यांनी सुद्धा डेटाच्या दरात केलेली घट आणि दुसरीकडे वाढता स्मार्टफोनचा वापर यामुळे, सामान्य नागरिकांच्या टचस्क्रीनवर इंटरनेट खेळू लागले आहे. ही फार मोठी क्रांती आहे किंवा क्रांतीची सुरुवात आहे, आणि आगामी काळातील उद्योगाची संधी. इकॉनॉमिक टाइम्स ने या बाबतीत बातमी दिली आहे, की २०१८ हे वर्ष डिजिटल मीडियासाठी आनंददायी वर्ष असेल. २०१८ म्हणजे २०१८ पासून सर्वच! त्यामुळे जर तुम्ही उद्योग शोधात असाल किंवा नवीन उद्योगात येऊ इच्छित असाल तर डिजिटल मीडिया हे त्याचे स्वस्त उत्तर आहे. कमी गुंतवणूक अधिक लाभ!

डिजिटल मीडिया उद्योगांमध्ये, असे सर्व उद्योग समाविष्ट होऊ शकतात ज्यामध्ये कस्टमरकडे तुम्ही स्मार्ट फोनच्या माध्यमातून पोहोचू शकाल. कॉम्प्युटर, लॅपटॉपमधून तुमची सर्व्हिस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकाल असा कोणताही व्यवसाय तुम्ही निवडलात की तुम्ही या वर्षात वाढीस लागणाऱ्या उद्योगावर स्वार झाला आहात असे समजा.

तुम्ही ऑनलाईन उत्पन्न मिळवू शकाल किंवा, मोबाईल जाहिरातींमधून उत्पन्न मिळवू शकाल, किंवा गुगल एड्वर्डस मधून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून उत्पन्न मिळवू शकाल. याचा अर्थ तुम्ही तुमची सर्व्हिस अगदी मोफतही देऊ शकाल आणि त्यामोबदल्यात जाहिराती मिळवून उत्पन्न कमावू शंका . सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये ही सुद्धा एक क्रांतीच नाही का?

अजून एक गोष्ट जी पुढे आली आहे ती हि की स्थानिक भाषेतील कंटेण्टला अधिक व्ह्यूज किंवा वाचक असतात. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की इंग्रजीतील कन्टेन्ट जास्त खपतो तर तसं तसे नाही बरं का भाऊ! स्थानिक भाषाच राणी आहे याही खेळाची!

यासाठी तुमच्याकडे एक भन्नाट कल्पना, लोकांपर्यंत ती पोचवण्याची पद्धत, रेव्हेन्यू मॉडेल आणि एक वेबसाईट किंवा एप किंवा अगदी फेसबुक पेज आणि युट्युब अकाउंटअसणे आवश्यक आहे. तुम्ही निवडलेल्या उद्योगाप्रमाणे इतर गुंतवणूक बदलू शकते, पण ती कमीत कमी राही याची काळजी घ्या. त्यामुळे सुरुवातीला कमी असणारा नफा वाढेपर्यंत तुम्ही उद्योगात तग धरू शकाल.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 कोणकोणते व्यवसाय तुम्ही करू शकाल?

१. इ कॉमर्स: डिजिटल मीडिया म्हटले कि हा सर्वात परवलीचा व्यवसाय झाला. फ्लिपकार्ट, एमेझॉन ह्या इ कॉमर्स वेबसाईट आहेत. मात्र अशा अनेक लहानसहान वेबसाईट्स आहेत. काही तर फक्त ठराविक प्रॉडक्ट मध्येच गुंतलेल्या आहेत. तुहालाही जर इ कॉमर्स वेबसाईट सुरु करण्याची इच्छा असेल तर एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा. सध्या सर्व्हिसमध्ये ऑनलाईन सल्ले देणाऱ्या वेबसाईट्स वाढीस लागत आहेत. ह्यामध्ये कायदेशीर सल्ला, विमा आणि गुंतवणूक सल्ला, प्रॉपर्टी सल्ला यांचा समावेश होतो. मात्र जगभरात सर्वात जास्त बोलबाला आहे तो मेडिकल सल्ला देणाऱ्या कंपन्यांचा. यामुळे डॉक्टरांवरील खर्च कमी होत असल्याने जगभरात ह्याची आवश्यकता वाढत आहे. तुम्ही इतरही सेवा पुरवू शकाल. करा विचार!

 २. न्यूजपोर्टल: आमच्या सारख्या वेबपोर्टलची आवश्यकता येणाऱ्या काळात वाढेल. घड्णाय्रा घटना, चांगले लेख विश्लेषण यासाठी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रावर अवलंबून असण्याचे दिवस संपले. आता, इन्स्टंट हवे आहे. येणाऱ्या काळात याच न्यूजपोर्टलचा बोलबाला असेल. तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी असाल तर तुम्हाला अधिक क्राउड मिळेल असे वाटत असेल. पण वर म्हटल्याप्रमाणे, स्थानिक भाषेतील कन्टेन्ट अधिक चांगला विकला जातो आहे. इथे सुद्धा तुम्ही विशिष्ट्य विषयावर लक्ष दिलेत आणि स्पेशिअलायझेशन केलेत तर तुम्हाला अधिक वाचकवर्ग मिळू शकतो.

 ३. ऑनलाईन व्हिडीओ : इकॉनॉमिक टाइम्स मध्ये उल्लेख आहे, एमेझॉन प्राईम व्हिडीओचा. व्हिडीओ मध्ये भारताचा विशेषतः तरुणांचा खूप जास्त डेटा खर्च होतो. तुम्ही कुठचा व्हिडीओ देऊ शकाल? व्हिडीओ कलात्मक संपदा असल्याने त्यामध्ये कॉपीराईट चा मोठा इश्यू असतो. त्यामुळे जे व्हिडीओ तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा करून घेऊ शकता ते तुम्ही वेबसाईटवर किंवा स्वतःचे युट्युब चॅनल बनवून टाकू शकाल. एखादे व्हिडीओ गाणे युट्युब वरून व्हायरल झाल्याच्या अनेक केसेस तुम्हीही ऐकल्या असतील. कोलावरी पासून ते शांताबाई पर्यंत आणि अगदी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का पर्यंत. असे अनेक होम मेड शोज आहेत जे स्वतः तुम्ही शूट करून अपलोड करू शकता. असे अनेक शोज सुद्धा हिट झालेले आहेत. थोडीसी मजा धम्माल असणारा व्हिडीओ असेल तर तरुण त्याला खूप लाईक करतेच आणि व्हायरल सुद्धा करते. पहा तुम्ही असे काही व्हिडीओ बनवू शकत असाल तर!

 ४. वेब सिरीज: तुम्ही कार्यक्रम बघता तसाच हा कार्यक्रम असतो मात्र तो फक्त वेबसाईटच्या किसून यूट्यूबच्या माध्यमातुन पहिला जातो. सध्या तरुणांमध्ये वेबसिरीज बघण्याची क्रेझ वाढली आहे. तुम्ही एखादी वेब्सिरीज काढू शकता का? यातही काही फंडू करू शकत असाल तर तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतील. युट्युब मधून उत्तम पैसेही मिळतात. यासाठी तुमच्याकडे चांगला कॅमेरा आणि एडिटिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे. कारण जो दुखता है वो बिकता है बॉस्स!

 ५. ऑडिओ: तुम्ही काही गाणी बनवू शकता का? फंडू गाणी जी लोकांच्या सहज ओठांवर जातील. अर्थात एखादे सॉफ्ट, रोमँटिक गाणे किंवा अगदी शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय गाणे सुद्धा तुम्हाला हिट करू शकते. तुम्ही जर अशी गाणी सातत्याने बनवत राहिलात तर यु नेव्हर नो तुमचे फॉलोवर्स तयार होतील. यासाठी तुम्हाला घरी किंवा बंद जागेत स्टुडिओ वातावरण करून गाणे रेकॉर्ड करण्याची सोय, सोबत उत्तम संगीत दिग्दर्शक आणि एक अरेंजर जो कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वरच गाणे कंपोज करू शकेल, याची आवश्यकता आहे. इकॉनॉमिक टाइम्स मध्ये उल्लेख गाना वेबसाईटचा आहे, जो ऑनलाईन गाणी ऐकायला देते. मात्र यामध्ये सुद्धा कॉपीराइटचा इश्यू आहे. त्यामुळे तुम्ही हे मॉडेल वापरू शकत नाही. हा, पण नवोदित गायकांची गाणी तुम्ही देऊ शकत असाल तर एखादे एप तुम्हीसुद्धा बनवून घेऊ शकता! तुम्हाला मोबाईल जाहिरातींद्वारे पैसे कमावता येतो.

 ६. टेक शो: तुम्ही टेक्नो सॅव्ही असाल तर तुम्हाला गॅझेट्स संबंधित माहिती पसरवून पैसे कमावता येतील. यासाठी तुम्ही वेबसाईट, एप, व्हिडीओ कशाचाही आधार घेऊ शकाल. इथेही स्थानिक भाषेत कन्टेन्ट दिलात तर अजून उत्तम!

 ७. ट्रेनिंग : ऑनलाईन ट्रेनिंगला उत्तम संधी मिळणार आहे. तुमच्याकडे काही शिकवण्यासारखे असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देऊन उत्तम पैसा कमावू शकाल. यामध्ये एकदा कन्टेन्ट बनवलात की त्यात अपडेट्स टाकण्याची आवश्यकता लागेपर्यंत तुम्हाला पुन्हा पाहायला नको.  याचा फायदा असा की तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अनंत काळ चांगले पैसे देऊ शकते. मात्र लोकांना आवडेल, लोक पाहतील असा व्हिडीओ हवा. असा विषय हवा. यामध्ये काही तासापासून काही महिन्यांपर्यंत चालेल असे विषय तुम्ही शिकवू शकाल.

 ८. डिजिटल मार्केटिंग: तुम्हाला सोशल मीडिया समजत असेल आणि सोशल मार्केटिंग जमत असेल, तर डिजिटल मार्केटिंगला प्रचंड स्कोप मिळणार आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पैसे घेऊ शकाल आणि सर्व काम तुमच्या घरी बसून होईल.

 ९. फेसबुक मार्केट: फेसबुकवरून तुम्ही विक्री सुद्धा करू शकाल. तुमचे ओइज हेच तुमचे सेलिंग पोर्टल असेल. फक्त वेळेवर पैसे घेणं आणि वेळेवर माल देणं हे अत्यावश्यक आहे. यामध्ये मार्केटिंग कोस्ट कमी होते.

वरील उद्योगांमध्ये कमीत कमी गुंतवणूक हवी आहे. अर्थात, तुम्ही तुमच्या उद्योगात चांगली क्वालिटी टिकवण्यासाठी थोडी गुंतवणुक आवश्यक ठरते. तर हे होते २०१८ मध्ये ओपन होणारे आणि अधिक विस्तारात जाणारे मार्केट. उद्योगाचा विचार करा तर डिजिटल इंडियात प्रवेश करा,या नि जगभर पोहोचा निमिषार्धात!

 हॅपी बिजनेस इयर २०१८!


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Next Article

सरोजिनी बाबर

You may also like