रिझर्व्ह बँकेची मॉनेटरी पॉलिसी जाहीर: व्याजदरात कपात नाही, महागाई १७ महिन्यांच्या उच्चांकावर

Author: Share:

रिझर्व्ह बँकेने आज आपली मॉनेटरी पॉलिसी जाहीर केली. ह्यामध्ये व्याजदरात अपेक्षेप्रमाणे कपात करण्यात आलेली नाही. व्याजदर (रेपो रेट) ६% ठेवण्यात आला आहे.

महागाईसंदर्भात रिजर्व बँकेने, ह्या चौथ्या तिमाहीत महागाई ५.१% राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे. हा दर १७ महिन्यातील उच्चांक आहे. पुःडील वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात महागाई ५.१-५.६% पर्यंत जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतरच्या सहामाहीत तो दार ४.३-४.७% येईल अशी आशा आहे.

२०१७-१८ चा जीडीपी ग्रोथ रेट ६.७% वरून ६.६% असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. ग्रोस व्हॅल्यू एडेड ६.१% वरून पुढील वर्षी ६.६% वाढेल अशी  अपेक्षा आहे तर २०१८-१९ मध्ये तो ७.२% पर्यंत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गव्हर्नरांनी फिस्कल स्लिप हा शब्द वापरला. भारताच्या फिस्कल डेफिसिट (वित्तीय तूट) ३% आणायच्या लक्ष्यासाठी २०२१ पर्यंत वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता गव्हर्नरांनी व्यक्त केली. पुढील तीन वर्षे वित्तीय तूट ३% पेक्षा जास्त राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

बजेटमध्ये मांडण्यात आलेल्या किमान शेतकी मूल्य योजनेचा महागाईवर काय परिणाम होईल हे पाहण्याची  आवश्यकता आहे मात्र त्याची पूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही असेही ते म्हणाले.

एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्था सध्या नाजूक अवस्थेत असल्याचे त्यांनी मान्य केले. आज सेन्सेक्स १०० पॉईंट पडून ३४०८२ वर बंद झाला.

Previous Article

अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी

Next Article

बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर

You may also like