आई

Author: Share:

अशी कशी गं तु आई
अशी कशी गं तु आई,
नेहमीच तुला असते घाई
माझ्यासाठी तु ठेवली दाई
पण त्यात काही अर्थ नाही

तु नेते मला माँलमध्ये
आणतेस खुप भारीचे, चाँकलेटस्, बिस्कीट, खेळणी,
…पण त्यापेक्षा कधीतरी
मला जवळ घे, मला तुझ्या हातची गरम पोळी नाहीतर
तु केलेला लाडू, नाहीतर
दुधपोळीही चालेल, पण
तुझ्या हाताने तु मला भरव,
एखादी छान गोष्ट सांग आणी
झोपतांना मला तुझ्या कुशीत,
अंगाई गीत म्हणत, घेऊन झोप
( तुझा मोबाईल, ल्यापटाँप, टी.व्ही., सगळं बाजूला ठेवून),
खूप खूप बरं वाटेल मला,
खूप सांगायचं तुझ्या कानात,
जे आहे माझ्या मनात,

तु आणतेस खूप भारीचे ड्रेस
पण तुला कळतंच नाही
माझी केस,

उद्या मीही मोठा होईन,
खूप पैसे कमवीन, तेव्हा
मीही करीन तुझी सेवा,
एखादी दाई ठेवून,
सर्वकाही देईन, पण
देणार नाही माझा वेळ,
तेव्हा तु म्हणशील, थांब बेटा
जरा माझ्याशी बोल,(2 मीनीटं), मला बरं वाटेल
तुझ्याशी बोलायला, पण मलाही वेळ नसेल,

अशी कशी गं तु आई,
अशी कशी गं तु आई,
नेहमीच तुला असते घाई,
माझ्यासाठी तु ठेवली दाई.

कवयित्री: सौ.विभा जोशी
संपर्क:.8691842662


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

विकासाच्या नावाखाली शहरे निसर्गाला गिळंकृत करताहेत : डॉ. अनिल अवचट

Next Article

अक्षय तृतीया

You may also like