वरुथीनी एकादशी मोदींचा आत्मक्लेश

Author: Share:

राहुल गांधींनी केलेले उपोषण हे दलितांच्या सन्मानार्थ होता.त्यांच्या उपोषणाचे काय झाले हे साऱ्यांना माहित आहे. १२.४५ ला राजघाटावर येन यातून सिद्ध होता कि खरंच तुम्ही दलितांच्या सन्मानार्थ उपोषण केला कि नौटंकी केली. असो मला त्यासंदर्भांत काही म्हणणं नाही लोकशाहीत कुणी काय करावं याचा ज्याला त्याला अधिकार आहे. पण जर थोडं तारतम्य बाळगून केल्यास वाईट काहीच नाही.लेख लिहिण्याचा हि तोच एक उद्धेश आहे, कि आपलयाला जनतेची काम करायची आहेत कि नौटंकी करून फक्त मीडिया समोर राहयाच आहे.

आज मोदींनी उपोषण केले ते सत्ताधारी असले तरी त्यांना हि लोकशाहीत अधीकार आहे स्वातंत्र्य आहे अन त्यांनीं तस केलं. ज्या वेळेला काँग्रेस सरकार होता त्यावेळेलाही संसदेचे कामकाज नाही होऊ दिले भाजप सरकारने ती त्यांची चूक असेल हि पण म्हणून काय तुम्ही हि संसदेचे कामकाज नाही होऊ देणार का? ह्यात हि तारतम्य बाळगावं. जनता आपल्याला संसदेत पाठवते म्हणजे त्यांची काम करण्यासाठी संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवण्यासाठी नाही. संसद हि जनतेच्या करातुन चालत असते. संसदेतील कामकाज चालून न देणं म्हणजे विरोधकांचा निव्वड, डोककेबाज आहेत तुम्ही जनतेची फसवणूक करत आहेत, विरोध करायचा तर संसद बंद पडून कशाला ठासून सांगा सर्व संसदेत सत्ताधार्यांनो तुमचं हे चुकतंय म्हणून.

तिथे जोरदार आवाज उठाव संसद बंद का पदवी अन जनतेचा पैसे का वाया घालवावा. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे दिसून आले लाखो करोडोंचे घोटाळे केले अन वरून आम्ही किती धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगणं म्हणजे जनतेची फसवणूकच. तुमच्या हाती ६० वर्षे होती तेव्हा का नाही दिसला दलित तेव्हा का नाही सुचले हे विषय लोकशाहि धोक्यात , असहिष्णुता, भारत माता कि जय नाही म्हणणं, हे विषय आताच का जन्माला आलेत का तुमच्या कडून सत्ता सोडवत नाही पराभव पचवला जात नाही.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


तिकडे पवार साहेब पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत तुमच्या कडे मुख्यमंत्री पॅड होता एवढी वर्ष आपल्या कडे सत्ता होती काय केला?
हो हे खर आहे प्रत्यकाने स्वप्न बघावीत पण सर्व काही मिळून आपण स्वप्न बघणं अन मुळात सत्तेवर असतांना काम न करन याला खरा विरोध आहे. व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे ह्या पेक्षा ती जनतेची काम किती करताय याला जास्त महत्व. पवार साहेबांनी जनतेची काम जर तेव्हा केली असती तर आज आम्हाही आनंद झाला असता एक मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार यांचा.

आज विरोध करायला काही नाही म्हणून काहीतरी कुरबुरी शोधायच्या अन विरोध करायचा खरंच जनतेची काळजी आहे का तुम्हाला हा खरा प्रश्न आहे आज जनतेने जे तुम्हाला नाकारलंय त्यामुळेच जनतेची इमानेइतबारे सेवा केली असती तर आज तुम्ही सत्तेत असता. पण नाही कधी जनतेसाठी काम केलीच नाही. केळीती स्वार्थापोटी काम केली फक्त सर्व जनता हे बघत राहिली म्हणून तुम्हाला जनतेने खाली खेचले.
आज नरेंद्र मोदी हे जर चुकत असतील तर जनता हि त्यांना एक वेळ खाली खेचल पण असा काय चूक आहे तेव्हा जनता मोदींना खाली खेचल. मोदींनी आज विदेश नीती सुधारलीय आहे.आधी च्या भारतात अन आजच्या भारतात खूप फरक आहे मोदींनमुळे. पुष्कळशे विदेशी कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे. भरपूर देशांचे भारताशी मैत्रीचे संबंध आहेत. का तर त्यादेशांना भेटी देऊन भारत तुम्हाला का चांगला आहे हे मोदी त्यादेशांना पटवून देतात विश्वास संपदन कारण हि वेगळीच कला असते.

इस्राईल सारख्या देशांनी भारताला खूप मदत केलीय काँग्रेस च्या काळात शांतिवादींना घाबरून काँग्रेस इस्राईल बरोबर संपर्क ठेवत नव्हता त्यांच्या बरोबर करार करत नव्हता. ज्या देशाने भारताला युद्धात मदत केली असताना आपण त्यादेशाशी निव्वड शांतिदूत नाराज होतील म्हणून का करार होत नसतील तर काँग्रेस च्या बऱ्याच गोष्टींवर प्रश्न चिन्ह उपस्थित करू शकतो. योग दिवस १४४ देशांना संयुक्त राष्ट्र संघटनेत पाठिंबा द्यावा लागण म्हणजे मोदी या नावाची केवढी मोठी छाप असू शकते याचा अंदाज आपल्या येईलच.

विरोधकांनी सद्विवेक बुद्धी जागरूक ठेऊन कुठलाही विरोध करावा उगाच मोदींच्या विरोधात का बोलावे. चूक असेल तर जरूर बोलावे शेतकऱ्यांच्या विषयाविषयी जरूर बोलावे. पण सद्विवेक बुध्धी वापरूनच बोलावे. नोटा बंदी विषयी विरोधकांनी जे काही जबरदस्त विरोध केलेला का केला तो विऱोध जो पैसा खूप मोठ्या प्रमाणात साठून ठेवला होता त्याची रद्दी झाली म्हणून कि खरंच मोदींचे चुकले म्हणून का का करावा विरोध?


ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुळकर्णी यांचा “राहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार?” हा लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: http://smartmaharashtra.online/rahul-gandhi/


आज वरुथीणी एकादशी असून त्याच दिवशी मोदींनी उपवास करून आत्मक्लेश कारण म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आज संपूर्ण भाजपच्या कार्यकत्यांनी आनि त्यांना समर्थन करणाऱ्यांनी उपवास केला. आज ज्यांनी उपवास केला त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा मिळणार आहे असं शास्त्रात लिहिलं आहे. आपण वाचू शकतात. १० हजार तपाचे पुण्य आजच्या एकादशी करणाऱ्याला लाभलय असा हिंदू शास्त्रात म्हटलं आहे.

खर तर दलित हा शब्दच काँग्रेसने सोयीनुसार राजकारण व्हावं म्हणून घेतलाय. पण कुणालाही दलित ना मानाने हाच खरा धर्म आहे. दलित हा शब्धच का वापरावं. आमच्या दृष्टीने सर्व सामान आहेत. एका आहेत.आम्ही कुणालाही दलित मानत.ह्या भारतात जो जन्माला तो भारतीय मग तो कुणीही असो. संत म्हणून गेलेत कि “हे विश्वाची माझे घर” मग ह्या विश्वातील सर्व मानव एक आहोत. मानवता हाच खरा धर्म आहे.

लेखक: विरेंद्र सोनावणे
संपर्क: 8888244883


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

सायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांना “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड २०१८” चा किताब

Next Article

विकास

You may also like