मोदींच्या चीन दौऱ्याचे फलित

Author: Share:

मोदींचा चीन दौरा झाला.चीनचे राष्ट्राध्यक्ष शीजिनपिंग यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीचापरिणाम पाकिस्थानवर नक्कीच झालेला आहे. ह्याभेटीचे महत्व, जगाणे ह्या भेटीकडे दिलेल लक्ष यामुळेह्या भेटीला विशेष महत्व प्राप्त होत.डोकलामचा विषय,वन बेल्ट वन रोड,चीनची आर्थिक परिस्थिती ह्यासाऱ्या बाबींचा विचार करण्याची गरज आहे.

भारत अन चीन दोन देश मिळून २७० करोड च्या ह्यालोकसंख्या आहे. जगाभरतील ४० टक्के लोकसंख्याफक्त भारत अन चीन हे दोन मिळून देश आहे. नरेंद्रमोदी अन शी जिंगपिंग यांच्या मुलाखतीत विदेश नीतीठरवली जाणार. निश्चित आहे भारत अन चीन संबंधनव्याने पुन्हा जिवंत झाले आहेत. ह्या भेटीकडे संपूर्णजागाच लक्ष होते. अनौपचारिक भेटीचे हे पर्व असेचसुरु राहावे ह्या साठी पुन्हा एकदा भारतात २०१९ मध्येभेट होणार आहे. संपूर्ण जग ह्या कडे एक आदर्श म्हणूनबघत आहे.अनौपचारिक भेटी अमेरिका अन रशिया यादेशात हि झाल्या आहेत. मोदी अन शी जिंगपिंग यांच्याभेटीला वसंत म्हटले गेले आहे. चीन च्या मान्यतेनुसारवसंत ऋतू वार्षिक नियोजनासाठी महत्वाचा आहे.

वसंतऋतू सगळ्यात चांगला अन शुभ कालावधीअसतो. वुहान शहराला ऐतिहासिक महत्व आहे. ह्या शहरात हान आणि तांग शासनाची निशाणीआहे. त्यामुळे ह्या शहराला खूप महत्व आहे. त्याबरोबरीनेच ऊहान शहराला खूपच मोठे औद्योगिकमहत्व पण आहे. संशोधानासाठी हि महत्वाचे हे शहर मानले गेले आहे. म्हणूनच भारत आणि चीनदरम्यानच्या भेटचे स्थान वुहान शहर निवडण्यातआले. या आधी दोन्ही देशांचे नेते असल्याअनौपचारिक बैठकीसाठी एकत्र नाही आले. याआधीच्या सर्व बैठक ह्या औपचारिक बैठक होत्या. औपचारीक जिथे असते तिथे फक्त कागदी मुलाखतीहोतात.

नरेंद्र मोदीनी चीनला दिलेली पहिलीच भेट नसूनह्या आधीही म्हणजे आठ महिन्यांपूर्वी मोदींनी चीनचादौरा केला होता. अनौपचारिक भेटहि १९५४ नंतरपहिल्यांदाच झाली आहे. असली चीन बरोबर भेटकरणारे नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरूं नंतरपहिलेच पंतप्रधान आहेत.१९५४ मध्ये नेहरूंनीपंचशील करार केला होता. ६३ वर्षांपूर्वी २९ एप्रिल१९५४ भारत आणि चीन यांच्या पंचशील करार झालाहोता.ह्याकरारात अखंडतेचा सन्मान,आक्रमण नकरणे,देशांतर्गत परिथिती हस्तक्षेप न करणे,सामानआणि एकमेकांच्या हिताचे संबंध जोपासलेजावेत,शांतीपूर्ण संबंध. ह्या पाच करारालाच पंचशीलकरार म्हटले गेले आहे. भारताला स्वातंत्र्यमिळाल्यानंतर बरोबर दोन वर्षांनीं चीनने तिबेट वरहमला केला अन तिबेट जिंकून चीनने त्याला आपलेराज्य घोषित केले.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


चीनने तिबेटवर कब्जा केल्यामुळेचीनला भारताच्या सीमावर येणे सोपे झाले. भारत अनचीन यांच्यातली तिबेट हि एक दुरी होती अन तीही१९५० च्या ह्या हमल्यात चीनने संपवली अन भारताचीडोकेदुखी वाढवली. ह्या हमल्यामुळे भारताच्या सुरक्षेचामोठा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन पंतप्रधाननेहरूंनी त्यावेळेला असे म्हटले कि चीन अनभारताच्या मैत्रीतच आपण सुरक्षा शोधलीपाहिजे. तत्कालीन गृहमंत्री वल्लभ भाई पटेल यांनीअसे म्हंटले कि “चीन आपल्या देश बरोबर धोकाकेलाय देशाशी विश्वास घात केलाय चीन आसामच्याकाही भागावर नजर ठेऊन आहे लवकरात लवकर ह्यासमस्याच समाधान झाले पाहिजे”

मॅकमोहन लाइन जी ब्रिटिश इंडिया, चीन अन तिबेटयांनी मिळून तयार केली होती.चीन सरकार यालामानायला तयार नव्हते.१९५२ मध्ये झालेल्यासमझोत्यात भारताने पंचशील करारावर स्वाक्षरीकेली.भारत अन चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असावेतम्हणून हा करार करण्यात आला होता.

डोकलाम क्षेत्र, १०० किमी पेक्षाही कमीअसलेल्या क्षेत्रात तीन देशांच्या सीमा रेषा आहेत.ह्यातएक पठार अन एक दरीचा भाग आहे.तिबेटच्या चिंबीव्हॅली, भूतानच्या हॅ व्हॅली आणि सिक्कीम राज्याने तोभाग व्यापला आहे.चीन आणि भूतान यांच्या अनेकबैठकांनंतर हि वादावर पडदा नाही पडू शकला. २०१७मध्ये चीन त्या भागात रस्ता बांधत असताना भूताननेभारताच्या मदतीने चीन सैन्याला रस्ता बांधकामकरण्यापासून थांबवले. भूतानी सरकारने चीनलासांगितले होत कि भूटानमधील रस्ता बांधकाम हाकरारांचा थेट उल्लंघन आहे आणि आमच्या दोनदेशांमधील सीमारेषाच्या सीमारेषाची प्रक्रिया प्रभावितकरते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले कि चीनचे हे बांधकाम भारताच्या अन भूतान च्या सुरक्षेसाठीबाधक ठरू शकते.

भारत आणि चीन जगातील सर्वातलांब विवादित सीमा आणि क्षेत्रांपैकी एक आहे – ज्यात37,000 चौरस किलोमीटरचा निर्वासित अक्साई चीनआणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. 1.4दशलक्ष लोक आणि 84,000 चौ. कि. मी. भारत चीनदोन्हीदेशांमध्ये वाटाघाटीसाठी प्रयत होत असून हिप्रयत्न यश मिळालं नाही पण गेल्या काहीमहिन्यापासून चीन सकारात्मक स्थितीतआहे.मोदींच्या कूटनीतीपुढे चीन सध्या तरी अक्षरशःगुडघे टेकले आहेत. डोकलाम मधून सैन्य मागे घेतलेआहे.

व्यावहारिक दृष्टिकोनातून शेजारी राष्ट्रांबरोबरपायाभूत सुविधांची निर्मिती करणे, वन बेल्ट वन रोडह्यापुढाकारातून औद्यौगिक दृष्टिकोनातून बघताउत्पादन सुविधा याखेरीज बी र आय देशांमध्येस्थलांतरित होईल.बेल्ट आणि रोड ह्यापुढाकारूतूनकाही विश्लेषकांच्या मते , आशिया खंडातील प्रादेशिकनेतृत्व लढण्यासाठी अमेरिकेच्या खर्चावर चिनी प्रभाववाढविण्याचा मार्ग आहे. चीनच्या व्यापाराच्यानियमांबरोबरच लष्करी प्रभावाखाली असलेल्यापायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीपाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणिअफगाणिस्तान यासारख्या दक्षिण आशियाई देशांतकोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारतामध्येथेट परदेशी गुंतवणूकीतील (एफडीआय) सर्वात जलदवाढणार्या स्त्रोतांपैकी एक चीन म्हणून उदयाला आलाआहे.

तज्ज्ञांनी सांगितंलय कि भविष्याला समजण्यासाठीइतिहासाला समजण्याची गरज आहे.भारताचे एकूणदेशांतर्गत उत्पादन बघेतले तर ७ % पर्यंत आहे तरचीनचे देशांतर्गत उत्पादन ७% आहे. ब्रिटनच्याअर्थशात्रीय अहवालानुसार २००० वर्षांपूर्वी चीन आणिभारत यांचे देशांतर्गत उत्पादन हे ५१% होते म्हणाजेसंपूर्ण जगाच्या ५०% अर्थव्यवस्था हि फक्त ह्या दोनदेशांची मिळून होती. त्यांनतर मुघल साम्राज्यात हेचएकूण देशांतर्गत उत्पादन कायम राहिले पण त्यानंतरब्रिटिश साम्राज्य आले.भारताला सोन्याची चिडियाम्हटल्या ह्या भारतात ब्रिटिशांनी पूर्ण अर्थ व्यवस्थाच कमकुवत केली अन आज भारताचे देशांतर्गत उत्पादनखूपच कमी आहे. १८२० ते १९२० मध्ये संपूर्ण पच्छिमयुरोपचे देशांतर्गत उत्पादन हे ३० % पे क्षाही जास्तझाले होते.

कारण पच्छिम युरोपात औद्यागिक क्रांतीआली होती. जी पीडा भारताची आहे तीच चीनची पणत्यामुळेच दोन्ही देशांच्या मैत्रीचा आधारच हाच आहे.पण नंतरच्या काळात चीनने भरपूर प्रगतीकेली.जगाच्या पाठीवर विचार केला तर भारताचे देशांतर्गत उत्पादन हे ७ % आहे तर चीनचे १८ %आहे.जगाच्या उत्पादनात भारत अन चीन मिळून २५% उत्पादन आहे. भारत आणि चीन दोन्ही देशाच्यामहत्वाकांक्षेचा विचार केला तर भारताचा अन चीनदोघांचे २००० वर्षांपूर्वीचे सुवर्ण युग परत यावे.चीनभारताच्या ४ पटीने पुढे गेलाय. जगाच्या पाठीवर सर्वचदेश आपापल्या देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी प्रयत्नकरत असतात. हे देश स्पर्धात्मक दृष्टीनेच विचार करतात. भारत चीन दोघांमध्ये देशांतर्गत उत्पादनवाढीसाठी स्पर्धा आहे. पण जर का आपण इतिहासाचासहारा घेतला तर आपल्याला नक्की जानवेल किभारतजवळ खूप सामर्थ्य आहे भारत आपले सुवर्ण युगपुन्हा अनु शकेल.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळेच चीनला आजभारताचीही आठवण झाली आहे.१३० करोडलोकसंख्या असलेला भारत चीनसाठी खूप मोठीबाजारपेठ आहे आनि हि बाजारपेठ चीनच्या हातूनजाणे म्हणजे चीनला खूप मोठे नुकसानीचे आहे. त्यामुळेच चीननेहि आज भारताला जवळ करण्याचाविचार केला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी चीनच्या राष्ट्रपतीनीसांगितलं होत होत कि २१वे शतक भारत आणि चीनचेअसले पाहिजे.भारत आणि चीन जेव्हा स्पर्धात्ममकदृष्टिकोनातून विचार न करता एकमेकांचे आपसीसंबंध चांगले होतीलयाचा विचार करावा.भारत आणिचीन दोघांच्या संबंधांमध्ये खूपच चढ उतार आलेत.भारत आणि चीन दोघांचे संबंध जगाच्या सर्वातमहत्वाच्या संबंधातील एक आहे. पंतप्रधान हे चीनच्याराष्ट्राध्यक्षांशी अकरा वेळा भेटले आहेत.मोदींच्याविदेशी कूटनीती आणि भारतातील राजनीतिकबदलावं ह्या साऱ्या गोष्टी चीन जाणून आहे त्यामुळेचचीन भारताला एक खुपमोठ्या भागिदारापैकी बघतआहेत. चिनी मिडियातून हि ह्या गोष्टीसमोर आल्याआहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हटले की “भारत आणि चीनचेसंबंध प्राचीन काळापासून आहेत”. भारत आणि चीनसंबंधातील प्राचीन काळी नालंदा विश्वविद्यालय एकदुवा होता.चिनी छात्र भारतात ह्या नालंदा विश्वविद्यालयात शिकण्यासाठी यायचे आणि तेथील शिक्षासंपल्यावर चीन छात्र भारतातील शिक्षकांना एका गुरुप्रमाणे मानत आणि संपूर्ण त्यांच्या आयुष्यात चिनी छात्रभारतीय प्राध्यापकांना विसरत नसे.त्यांचा पत्रव्यवरनेहमी होत असे. ह्वेन त्सांग आणि इत्सिंग यांसारख्याछात्रांनी नालंदाविषयी भरपूर लिहून ठेवले आहे.भारतआणि चीन यांच्यातले एवढे चांगले संबंध होते मग तेएवढ्या पराकोटीला का गेले तर याचे कारण आहेभारतावर अरब आणि तुर्क देशांनी केलेलआक्रमण. तुर्क आणि अरब राष्ट्त्रांनी भारताच्यातक्षशिला आणि नालंदा ह्या खूप मोठ्या विख्यातविशवविद्यालयावर आक्रमण केली. १२व्या शतकातबख्त्यार खिलजीने नालंदावर आक्रमण करून सांपूर्णनालंदा विश्वविद्यालय जाळून राख केले.

संयुक्त राष्ट्राच्या विश्व् शांती कायर्क्रम भारताचं खूपमोठा वाटा आहे. जगाचे लक्ष लागून असलेला मोदींच्या ह्यादौऱ्यात आतंगवादाविरोध लढण्याच्याउपाययोनावावर हि चर्चा झाली असावी. संयुक्तराष्ट्राच्या एससिओ ह्यासंघटने डिसेम्बर महिन्यातरसियामध्ये चीन आणि भारत पाकिस्थान आणि बाकीसहयोगी देश मिळून सैन्य सराव करणारआहेत. एससिओ ह्यासंघटनेचा मुख्य मुद्दा हाआतंगवादाच्या याविरोधात लढण्याचा आहे. नरेंद्र मोदीत्यांच्या विदेशी दौऱ्यात आतंवादच्या विरोधातलढण्यासाठी नेहमी आवाहन करतअसतात. पाकिस्थानवर दबाव जाण्यासाठी हि ह्याबैठकीकडे बघता येईल.पाकिस्थान नेहमीआतंकवादालाच पाठिंबा देत आला आहे. पाकिस्थानवरआता तर अमेरिकेनेही खूप मोठा दबाव टाकलाय. अमेररिकेने त्यांच्या आर्थिकसाहाय्यावर निर्बंधघातलेत.

लेखक: विरेंद्र सोनावणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

४ मे 

Next Article

सर्कस

You may also like