मुंबई: मीरारोडच्या क्वीन मेरी पार्क मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्याने सकाळी गोंधळ उडाला होता. पण त्यानंतर अर्धा तासात ईव्हीएम सुरु करण्यात आले. परंतु पुन्हा एकदा मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात ज्याप्रमाणे मतदार याद्य़ांमध्ये घोळ होत आहे, त्याप्रमाणे हा लोकशाहीचा अवमानच आहे.
मतदार यादीतील घोळ प्रत्येक निवडणूकीत समोर येत आहे. य़ावेळेस तर अनेक वर्षांपासून मतदान करणा-या लोकांची नावं मतदार यादीतून छू मंतर झाली आहेत. कित्येक मतदारांना मतदान केंद्रावरून मत न नोंदवता घरचा रस्ता धरावा लागत आहे.
भाईंदर महापालिकेच्या ९४ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकीसाठी ५०९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता पाहायचे आहे की मतदार यादीतील घोळ कुणाच्या पथ्यावर पडणार आहे.