Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा?

Author: Share:

मुंबई: मिरा भाईंदर महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणी सुरु आहे. आज ९४ जागांसाठी ५०९ उमेदवारांपैकी कोण नशीबवान ठरणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. मीरा-भाईंदरमधील सर्व केबल चॅनेलवर मतमोजणीचं थेट प्रेक्षपण केलं जाणार आहे.

सध्या भाजपचा अश्वमेध सुसाट आहे. तो रोखण्यास शिवसेना यशस्वी होईल का? हे पाहायचे आहे. ही निवडणूक म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस आहे. काँग्रेसही आपले नशीब आजमावत आहे.

काल मोठ्या प्रमाणात मतदान होईल असे वाटत होते. परंतु पावसाने दिमाखात हजेरी लावल्यामुळे मतदारांनी दांडी मारली आणि केवळ ४७ टक्के मतदान झाले आहे.

उत्तन प्रभागात सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के मतदान झाले. नयानगर येथील प्रभाग २२ मध्ये केवळ ३५.३८ टक्के म्हणजे सर्वात कमी मतदान झाले. मुर्धा, राई या प्रभागांतही ६० टक्के इतके मतदान झाले. इतर मतदान केंद्रांवर जवळजवळ ५० टक्के मतदान झाले.

राज्याच्या राजकारणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीला महत्त्व नसले तरी भाजप आणि शिवसेना याम्च्यात कोण वरचढ ठरतो याची सध्या स्पर्ध अलागली आहे.

Previous Article

आज पोळा 

Next Article

एनाबेल क्रिएशन: स्मार्ट महाराष्ट्र रिव्ह्यू

You may also like