Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मिरा भाईंदरमध्ये कमळ फुलणार की बाण निशाण्यावर लागणार?

Author: Share:

मुंबई: मिरा भाईंदर महापालिकेसाठी अटीतटीची लढाई पाहण्यास मिळत आहे. सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे कुणाची सत्ता येणार अशी चर्चा रंगली आहे. त्यात शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष आघाडीवर असल्याचे कळते.

२० ऑगस्टला निवडणूक होणार आहे. २४ प्रभागातल्या ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल २१ ऑगस्टला लागणार आहे. वडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी शिवसेनेची कास धरली असली तरी भाजप अत्यंत जिद्दीने लढत आहे.

शुक्रवारी संध्याकाळनंतर मीरा-भाईंदरमध रणसंग्रामाच्या तोफा थंडावतील. त्यानंतर २० ऑगस्टला निवडणूक होऊन २१ ऑगस्टला निकाल येईल. या निवडणूकीतील २२ उमेदवार अशिक्षित असून ११७ उमेदवार केवळ दहावी पास आहेत. आता पाहायचे आहे मतदार कुणाच्या बाजूने कौल देतील?

Previous Article

आता तरी रायगडाला जाग येईल…

Next Article

१८ ऑगस्ट

You may also like