Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मिरा-भाईंदर महापालिकेत कमळ फुललं

Author: Share:

मुंबई: मिरा-भाईंदर महापालिकेतही भाजपचे अश्वमेध कयम राहिले आहे. भाजपने मीरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ९५ पैकी ६१ जागा भाजपने मिळवल्या आहेत.

शिवसेनेला केवळ २२ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी आणि मनसेला खातेही उघडता आले नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे.

या निवडणूकीआधी शिवसेनेचं पारडं जड वाटत होतं. पण मिरा-भायंदरच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही जरी महत्वाची मानली जात नसली तरी शिवसेना आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि यामध्ये त्यांना यशही मिळाले आहे.

भाजप – एकसष्ट
शिवसेना – बावीस
कॉंग्रेस – दहा
अपक्ष – दोन
राष्ट्रवादी – शून्य
मनसे – शून्य

Previous Article

आशीष शेलार यांनी शिवसेनेला फटकारले; मीरा-भाईंदरकरांनी “लबाडाघरचे आमंत्रण” नाकारले.

Next Article

नांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला

You may also like